विशेष

पंढरपूर तालुका : कोरोनामुळे मृत्यूचा आकडा पाचशे पार !


पंढरपूर –  कोरोनाच्या पहिल्या व दुसर्‍या लाटेत सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये सर्वाधिक फटका हा पंढरपूर तालुक्याला बसला असून येथे या काळात 502 जणांना आपले प्राण या आजारात गमवावे लागले आहेत. हा तालुका कोरोनामुळे अनेक दिग्गजांना मुकला आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अजूनही संपलेला नाही. संभाव्य तिसर्‍या लाटेची शक्यता गृहित धरून उपाययोजना केल्या जात आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात या विषाणूने पंढरपूर तालुक्यात सर्वाधिक थैमान घातल्याचे चित्र होते. पहिल्या व दुसर्‍या लाटेत मिळून पंढरपूर तालुक्यात 25 हजार 627 कोरोनाचे रूग्ण आढळून आले. यापैकी 502 जणांनी आपले प्राण गमावले आहेत.  या आजारावर मात करणार्‍यांची संख्या 24 हजार 784 इतकी असून मंगळवार 29 जूनच्या अहवालानुसार येथे अद्याप 341 जणांवर उपचार सुरू आहेत.
सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये पंढरपूर तालुका हा कोरोना रूग्णांच्या बाबतीत अग्रेसर राहिला आहे. तसेच येथे सर्वाधिक मृत्यूंची ही नोंद आहे. पंढरपूर पाठोपाठ बार्शी  तालुक्यात 455 , माळशिरस 371, माढा 339, मोहोळ 331 असे कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत. पंढरपूर तालुक्याने अनेक दिग्गजांना कोरोनामुळे गमावले आहेत. यात राजकीय, आध्यात्मिक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा समावेश आहे. येथील राजकीय क्षेत्राचे अतोनात नुकसान या आजाराने केले आहे. स्व.सुधाकरपंत परिचारक, आमदार भारत भालके, राजूबापू पाटील यांच्यासह भागवताचार्य वा.ना. उत्पात, रामदास महाराज जाधव यांच्यासह अनेकांना हा तालुका कोरोनामुळे मुकला आहे. पत्रकारिता क्षेत्रालाही याचा फटका बसला आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत पंढरपूर भागात सर्वाधिक रूग्ण होते तर दुसर्‍या लाटेच्या वेळीही येथील रूग्णसंख्या वाढतच गेली आहे. स्व. भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधानसभेची पोटनिवडणूक झाली व यानंतर पंढरपूर व मंगळवेढ्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत खूप वाढ झाल्याचे दिसून आले. अद्यापही रूग्ण येथे सापडतच आहेत.
पंढरपूर शहरातील कोरोना रूग्णांची संख्या आटोक्यात आली असून येथे केवळ दहा जणांवर उपचार सुरू आहेत. मात्र ग्रामीण भागात कोरोनाचा अद्यापही पूर्णतः आटोक्यात आलेला नाही. ग्रामीण भागातील 331 जण या आजारावर उपचार घेत आहेत. पंढरपूर शहरात आजवर 8 हजार 281 तर ग्रामीणमध्ये 17 हजार 346 रूग्ण नोंदले गेले आहेत.

Header

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा IT Act 2000 नुसार गुन्हा आहे.
Close
Close