पंढरपूर तालुक्यात बुधवारी 117 कोरोनाबाधित रूग्ण आढळले
पंढरपूर – सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये बुधवार 30 जून रोजी 371 कोरोना रूग्ण आढळून आले असून यापैकी 117 एकट्या पंढरपूर तालुक्यातील आहेत. शहरात 10 तर ग्रामीण भागात 107 रूग्ण नोंदले गेले आहेत.
सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण पंढरपूर तालुक्यात सापडले असून आजवर 25 हजार 744 जणांची नोंद आहे तर 503 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत. सध्या 374 जणांवर उपचार सुरू आहेत.
पंढरपूर तालुक्यात ग्रामीण भागात अजूनही कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. 107 रूग्ण आज नोंदले गेले आहेत. कोरोनावर उपचार घेत असलेल्या 374 पैकी 361 जण हे ग्रामीण भागातील आहेत तर 13 हे पंढरपूर शहरातील आहेत. आजवर ग्रामीण भागात 17 हजार 453 कोरोनाबाधित आढळून आले आहेत तर शहरात 8 हजार 291 जणांची नोंद आहे.
बुधवारच्या अहवालानुसार 10 हजार 165 कोरोना चाचण्या जिल्हा ग्रामीणमध्ये झाल्या असून यापैकी 9 हजार 794 निगेटिव्ह आहेत. तीन जणांच्या मृत्यूची अहवालात नोंद आहे.