तंत्रज्ञान

‘केवळ तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनच ग्रामीण भागाचा विकास शक्य आहे’
: सुरेश शेणॉय

पंढरपूर-‘आजचा भारत देश हा जगातील प्रगत देशांच्या तुलनेत खूप तरुण आहे. पंचेवीस पेक्षा कमी वय असणारे भारतीय तरुण हे उद्याच्या विकसित देशाचे आधार आहेत. त्यांनी जर नवीन कौशल्ये, नवीन करिअरच्या संधी शोधल्या तर भारताचे भवितव्य उज्ज्वल आहे. डॉ. एपीजे अब्दुल कलामांच्या स्वप्नातील देश घडवण्यासाठी तरुणांनी पुढे आले पाहिजे. केवळ तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनच ग्रामीण भागाचा विकास शक्य आहे.’ असे प्रतिपादन व्हील्स ग्लोबल फाउंडेशन (युएसए)चे अध्यक्ष सुरेश शेणॉय यांनी केले.
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये स्वेरीज सोबस सेंटर ऑफ एक्सलंस, सोबस, बेंगलोर आणि व्हील्स ग्लोबल फौंडेशन, अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अॅसलरेटींग रुरल इनोव्हेशन अँड सोशल एन्टरप्रेनरशिप (ग्रामीण भागाच्या विकासासाठीच्या नवकल्पना व उद्योजकतेला गती देणे) या विषयावर आयोजिलेल्या संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून व्हील्स ग्लोबल फाउंडेशन (युएसए)चे अध्यक्ष सुरेश शेणॉय बोलत होते. दिपप्रज्वलनानंतर सोबस इनसाइट फोरम, बेंगलोरचे व्यवस्थापकीय संचालक दिग्विजय चौधरी यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट करून हे संमेलन आयोजित करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. पुढे स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी पाहुण्यांचे स्वागत करून व्हील्स ग्लोबल फाउंडेशन च्या कार्यावर प्रकाश टाकला व उद्योजकता विकासाचे महत्व सांगितले. मास्टेक चे संस्थापक चेअरमन आणि व्हील्स ग्लोबल फाउंडेशन, इंडियाचे अध्यक्ष अशांक देसाई म्हणाले कि, ‘भारताचा खऱ्या अर्थाने विकास व्हायचा असेल तर ग्रामीण भागाचा विकास होणे आवश्यक आहे.’ सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय भागीदार, कार्बन ग्रुप आणि बोर्ड सदस्य रतन अग्रवाल म्हणाले की, ‘उद्योजक होण्यासाठी विद्यार्थ्यांनी योग्य प्रश्न विचारण्याची सवय लावणे आवश्यक आहे. त्यासोबतच विद्यार्थ्यांनी नवीन आव्हाने स्वीकारली पाहिजेत.’ पुढे त्यांनी व्हील्स ग्लोबल फाउंडेशन कडून पाणी, शिक्षण, ऊर्जा आदी क्षेत्रात केल्या जाणाऱ्या कार्यावर प्रकाश टाकला. वेणुनगर, गुरसाळे येथील श्री विठ्ठल कारखान्याचे युवा चेअरमन अभिजित पाटील हे विद्यार्थ्यांना प्रेरीत करताना म्हणाले की, ‘जीवनात जर एक वेगळी व स्वतंत्र उंची गाठायची असेल तर अगोदर आपले ध्येय निश्चित केले पाहिजे. मी नोकरी करायची नाही हे ठरवले होते पण आता महिन्याला तीन कोटी इतका पगार इतरांना देत आहे. आयुष्यात मी सगळ्या गोष्टी ठरवून केल्या. आपण भविष्यात काय करणार आहोत हे जर ठरविले तर त्यातून नक्कीच यश मिळते. माझ्या यशामध्ये परिवाराबरोबरच मित्रांचाही वाटा आहे. आयुष्यात जे काही ठरवतो त्याचा पाठपुरावा करा. उत्पादन, ट्रेडींग आणि सेवा या तीन क्षेत्रांमुळे यशस्वी उद्योजक होता येते. आजच्या युवकांना योग्य दिशा, धाडसी वृत्ती आणि वेगाची गरज आहे आणि हे याच वयात शक्य आहे. जे काम आवडते त्यात करिअर करा. यासाठी जीवनात यशस्वी झालेल्या उद्योजकांसोबत फिरा, त्यामुळे अनुभव मिळतो.’ असे सांगून त्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नाची गरज असल्याचे सांगितले. डब्ल्यूजीएफ, यूएसए मधील माजी राजदूत आणि सचिव प्रदीप कपूर, उद्योजक राज डुबल, धनश्री परिवारचे प्रा. शिवाजीराव काळुंगे, जकराया साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक सचिन जाधव, संजय घोटाळकर हे देखील उपस्थित होते. यावेळी काही नागरिकांना स्वेरीकडुन टेलीमेडीसीन कीटचे वितरण करण्यात आले. यावेळी डब्ल्यूजीएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेव्हीजी कृष्णमूर्ती, सल्लागार आणि सल्लागार मंडळाचे अध्यक्ष सुशील भाटिया, सुरेश अडवाणी, मग्ना संग्रहालय समितीच्या डॉ.विभा गुप्ता, वरिष्ठ उपाध्यक्ष (तंत्रज्ञान) सुंदर कामथ,सौ. कामथ, सौ.देसाई, डॉ.वर्षा वैद्य, नितिन कुलकर्णी, सोबसच्या संचालक रेषा पटेल, गिरीष संपत, आकांक्षा सिन्हा, स्वेरीचे माजी अध्यक्ष व विश्वस्त धनंजय सालविठ्ठल, विश्वस्त एच.एम.बागल, संस्थापक विश्वस्त दादासाहेब रोंगे, विश्वस्त बी.डी.रोंगे, युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, डॉ. प्रदीप जाधव, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम. पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या महाविद्यालयांचे प्राचार्य, सर्व अधिष्ठाता, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी संशोधन विभागाचे अधिष्ठाता डॉ. आर. आर. गिड्डे, डॉ. प्रवीण ढवळे यांच्यासह इतर प्राध्यापकांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. यशपाल खेडकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार स्वेरीतील शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार यांनी मानले.

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close