स्वेरी अभियांत्रिकीच्या मॅकेनिकल इंजिनिअरिंग विभागाची प्लेसमेंट मध्ये भरारी, आय. टी. व प्रशासकीय क्षेत्रात देखील अनेक विद्यार्थी यशस्वी
पंढरपूर- ‘शैक्षणिक वर्ष २०२०-२१आणि २०२१-२२ चा विचार केला तर स्वेरीच्या मॅकेनिकल इंजिनिअरिंग या विभागाच्या विद्यार्थ्यांना तब्बल ३२१ हुन अधिक नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत’, अशी माहिती संस्थेचे सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी दिली.
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंट कडे विशेष लक्ष दिले जाते. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, ट्रेनिंग व प्लेसमेंट सेलच्या नेतृत्वाखाली व विभागप्रमुख डॉ. संदीप वांगीकर व विभागातील उच्चशिक्षित प्राध्यापकांच्या सहकार्याने गेल्या दोन वर्षात मिळालेल्या जॉब ऑफर्स याप्रमाणे आहेत. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कडून ३२, कॅपजेमिनी कडून २५, इन्फोसीस कडून २०, विप्रो कडून २३, मॅग्ना कडून ०९, कॉग्नीझंट कडून ०७, बॉश कडून ०३, डीएक्ससी टेक्नॉलॉजी कडून ०४, इंटेलिपॅट कडून ०२ तर बायजू कडून ०२ जॉब ऑफर्स मिळालेल्या आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या कोअर कंपन्यांकडून एकूण ९५ जॉब ऑफर्स मिळालेल्या आहेत तर ९९ जॉब ऑफर्स आय.टी. क्षेत्रातील नामांकित कंपन्याकडून मिळालेल्या आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरिंग च्या विद्यार्थ्यांना देखील आय.टी. कंपन्यांमध्ये मिळालेल्या या प्लेसमेंटमुळे स्वेरीमध्ये विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी मोठी गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. स्वेरी अभियांत्रिकीच्या मॅकेनिकल इंजिनिअरिंग मधील आकाश अजगर, सचिन क्षीरसागर, श्रद्धा गजाकोश, सौरभ खडसरे, रोहित आदलिंगे,
प्रणय डिसले, प्रणिल नागरस, युवराज शेलार व मानसी घोगले, मुस्कान आतार, आकाश वळसंगे आणि गणेश तोडकर यांना एकापेक्षा अधिक कंपन्यामध्ये नोकरीच्या संधी प्राप्त झाल्या आहेत.
विशेष म्हणजे प्रशासकीय क्षेत्रात देखील स्वेरी अभियांत्रिकीच्या मेकॅनिकल विभागाचे विद्यार्थी विशेष चमकले आहेत. त्यामध्ये संतोष माळी हे भारतीय महसूल सेवा,आयकर विभाग (युपीएससी -६१२ रँक), नागनाथ पाटील हे एपीआय अर्थात सहाय्यक पोलीस निरीक्षक, सुहास ठोंबरे हे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक,भालचंद्र यादव हे नायब तहसीलदार म्हणून मोहोळ मध्ये कार्यरत आहेत. अधिकाऱ्यांचे गाव म्हणून राज्यात स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या उपळाई (बुद्रुक) मधील श्रीकृष्ण नकाते हे परभणी मध्ये सहाय्यक आरटीओ, विवेक लोंढे हे सोलापूर मध्ये डेपो मॅनेजर, कौस्तुभ गव्हाणे हे मुख्याधिकारी, गणेश विघ्ने हे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, सुप्रिया घाडगे ह्या पुण्यात सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, अर्जुन मेलगिरी हे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, अजिंक्य दुबल हे उस्मानाबाद मध्ये सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, आशिष जाधव हे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, अमित पाटील हे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, कुलदीप पवार हे उस्मानाबादमध्ये मोटार वाहन निरीक्षक, दत्तात्रय शिंदे हे पुण्यात सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, अनिकेत वाघमारे हे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, आदिका खरात ह्या सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, सोनिका घाडगे ह्या अकलूज मध्ये सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, विशाल नाझीरकर हे
सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. सरकारी व प्रशासकीय क्षेत्रासोबतच आय.टी. क्षेत्रात देखील स्वेरी अभियांत्रिकीतील मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी आपला दबदबा निर्माण केलाय हे मात्र नक्की.