राज्य

राज्यात रेड झोन वगळता जिल्ह्यांतर्गत प्रवासासाठी ई-पास ची अट रद्द

मुंबई ः येत्या सोमवार 7 जून पासून राज्यातील कडक निर्बंध टप्प्याटप्प्याने उठविले जात असून असून त्यासाठी राज्य सरकारने जिल्हानिहाय गट तयार केले आहेत. त्यानुसार, पहिल्या गटात असलेल्या जिल्ह्यांतील लॉकडाउन पूर्णपणे उठणार असून रेड झोन वगळता जिल्ह्यांतर्गत प्रवासासाठी ई-पासची गरज लागणार नाही.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत राज्यात अनेक निर्बंध लावण्यात आले होते. मुंबईतील लोकल ट्रेनप्रमाणेच जिल्ह्यांतर्गत प्रवासावरही कठोर बंधने घालण्यात आली होती. लॉकडाउन काळात केवळ अत्यावश्यक कारणासाठी जिल्ह्यांतर्गत प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र त्या प्रवासासाठी ई-पास सक्तीचा करण्यात आला होता. त्यामुळे आपापल्या गावाकडे जाणार्‍या लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. गावाकडून मुंबईला येतानाही अनेक चौकशांना सामोरे जावे लागत होते.
अनेक कारणामुळे कधी-कधी वेळेवर ई-पास मिळत नसल्याने लोकांची मोठी अडचण झाली होती. ही आता दूर झाली आहे. राज्यातील अनलॉकबाबत शनिवारी मध्यरात्री राज्य सरकारने आदेश जारी केले आहेत. राज्यातील निर्बंध टप्प्याटप्प्याने कसे शिथिल होणार याची सविस्तर माहिती सरकारच्या परिपत्रकात देण्यात आली आहे. कोरोना
संसर्गाचा दर आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता या निकषावर जिल्ह्यांचे पाच गट करण्यात आले आहेत. त्यातील पहिल्या चार गटांत समावेश असलेल्या जिल्ह्यांत पूर्वीप्रमाणे प्रवास करता येणार आहे. खासगी कार, टॅक्सी, बस व पॅसेंजर रेल्वेने प्रवास करताना ई-पासची गरज लागणार नाही. मात्र, राज्य सरकारच्या नव्या निकषानुसार पाचव्या गटात असलेल्या ठिकाणी ई-पासशिवाय प्रवास करता येणार नाही. हा प्रवासही केवळ अत्यावश्यक कारणासाठीच करता येणार आहे.

Header

Related Articles

Back to top button
Close
Close