विशेष

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका रिपाइं (आठवले गट) स्बळावर लढविणार, पंढरपूरच्या जिल्हा बैठकीत निर्धार

पंढरपूर – सोलापूर जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढविण्यास कार्यकर्त्यांनी तयार राहावे. तसेच पक्षाच्या वाढीसाठी विधायक कामातून समाजातील विविध लोकांचा सहभाग वाढविण्यासाठी विशेष परिश्रम घेतले पाहिजेत. त्यासाठी आम्ही सर्व वरिष्ठ पदाधिकारी आपणास आवश्यक ती मदत करू, अशी ग्वाही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) राज्य संघटन सचिव सुनील सर्वगोड यांनी दिले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर पंढरपूर येथे आयोजित  करण्यात आलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) जिल्हा कार्यकारिणीची बैठक पार पडली. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष अशोक सरवदे होते. यावेळी सर्व तालुका प्रतिनिधींनी आपले मनोगत व्यक्त करून पक्षाचे राज्य संघटन सचिव  सुनील सर्वागोड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कार्यकारिणी जो निर्णय घेईल त्याप्रमाणे काम करू असे आश्‍वासन दिले.
सर्वगोड म्हणाले, पक्षाचे नेते केंद्रीय मंत्री रामदासआठवले साहेब आदेशानुसारआपण काम केले पाहिजे. लवकरच आठवले यांच्या उपस्थितीत महामेळावा घेतला जाईल.
सांगोला, मंगळवेढा, माळशिरस, माढा, करमाळा, बार्शी, अक्कलकोट, पंढरपूर, सोलापूर, मोहोळमधून आलेल्या पदाधिकार्‍यांनी आपले मतं मांडली. या बैठकीत रिक्त असलेल्या पंढरपूर शहर सरचिटणीसपदी प्रशांत लोंढे, पंढरपूर युवक तालुकाध्यक्षपदी रणजित कांबळे, शहराध्यक्षपदी विशाल मांदळे यांची नियुक्ती करण्यात आली.    
यावेळी  राज्य उपाध्यक्ष नंदकुमार केंगार, जिल्हा कार्याध्यक्ष अजितभाऊ गायकवाड, सरचिटणीस सूरज बनसोडे, उपाध्यक्ष उत्तम गायकवाड, युवक प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड.कीर्तीपाल सर्वगोड, पश्‍चिम महाराष्ट्र सचिव नागनाथ ओहोळ, संघटक दयानंद धाइंजे, जिल्हा उपाध्यक्ष अरुण बनसोडे, सोलापूर शहराध्यक्ष सुधीर बिडबाग, सोलापूर युवक शहराध्यक्ष लखन चंदनशिवे, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश सावंत यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. सूत्रसंचालन नितीन गायकवाड यांनी केले तर शहराध्यक्ष अरविंद कांबळे यांनी आभार मानले.

Header

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा IT Act 2000 नुसार गुन्हा आहे.
Close
Close