राज्य

बेळगाव महापालिकेत भाजपाचे निविर्वाद वर्चस्व


बेळगावः गेल्या दोन वर्षापासून प्रलंबित असलेल्या बेळगाव महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 35 जागा जिंकत निविर्वाद सत्ता मिळविली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीला येथे केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले आहे. दरम्यान दहा नगरसेवक निवडले गेल्याने काँगे्रस दुसर्‍या स्थानावर राहिला आहे.
बेळगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी 3 सप्टेंबर रोजी मतदान झाले होते तर आज सोमवार 6 रोजी मतमोजणी झाली. सुरूवातीपासूनच भाजपाने आघाडी घेतली होती ती मतमोजणीच्या अखेरपर्यंत कायम राहिली. या निवडणुकीत भाजपाने 35, काँगे्रस 10, अपक्ष 8, महाराष्ट्र एकीकरण समिती 4, एमआयएम ला1 जागा मिळाली आहे. मागील निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे 32 सदस्य सभागृहात होते. मात्र यंदा त्यांची पिछेहाट झालेली दिसत आहे.
या निवडणुकीत एकूण 385 उमेदवार रिंगणात होते.  सर्वाकिध जागा भाजपाने 55 लढविल्या होत्या तर या पाठोपाठ काँगे्रस 45, महाराष्ट्र एकीकरण समिती 21 तर जेडीएस 11, आम आदमी पार्टी 37, एमआयएमने 7 तर अपक्ष 217 जण रिंगणात होते. मोठ्या बंदोबस्तात मतमोजणी पार पडली आहे.
काहीच महिन्यांपूर्वी बेळगाव लोकसभेची पोटनिवडणूक झाली होती यात भाजपाची सरशी झाली होती तर येथील महापालिकाही भाजपाकडे आली. कर्नाटकात भाजपाचे राज्य आहे. आता बेळगाव महापालिकेतही या पक्षाने सत्ता काबीज केली आहे. येथे महापौर निवडीच्या वेळी खासदार व आमदारांनाही मतदानाचा अधिकार असतो. यासाठी महापालिकेत 33 सदस्य निवडणून आल्यास त्या पक्षाचा महापौर बनतो. येथे सध्याच भाजपाला 35 जागा मिळाल्या असून या पक्षाचे येथे दोन खासदार व दोन आमदार आहेत. 

Header

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा IT Act 2000 नुसार गुन्हा आहे.
Close
Close