142 जणांनी रक्तदान करून दिला सरत्या वर्षाला निरोप
पंढरपूर – सरत्या 2021 या वर्षाला निरोप आणि 2022 या नववर्षाचे स्वागत करण्यासाठी येथील एनआयटी कॉम्पुटर आणि शाम गोगाव व आदित्य फत्तेपूरकर मित्र परिवाराच्यावतीने शुक्रवारी रक्तदानाचे आयोजन करण्यात आले. यात 142 जणांनी रक्तदान केले
सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी विविध ठिकाणी कार्यक्रमांची रेलचेल असते. अशातच गेल्या अठरा वर्षांपासून येथील शाम गोगाव व आदित्य फत्तेपूरकर मित्र मंडळाच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. कोरोना संसर्गाने पुन्हा डोके वर काढले असताना देखील शासनाचे कोविड विषयक प्रतिबंधात्मक सर्व नियमांचे पालन करून येथील जेठाभाई धर्मशाळेत शुक्रवारी रक्तदान शिबिर संपन्न झाले. रक्तदान केल्यानंतर पुढील 48 तास मद्यपान व मांसाहार करता येत नाही असा वैद्यकीय सल्ला आहे. त्यामुळे थर्टी फस्ट ला तरुणाई व्यसनमुक्त राहावी, यासाठी ही चळवळ राबविली जात आहे.
या शिबिराचे उद्घाटन पांडुरंग कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत परिचारक , मनसेचे नेते दिलीप धोत्रे , मर्चंट बँकेचे अध्यक्ष नागेश भोसले , नीलराज डोंबे, भैरवनाथ शुगरचे अनिल सावंत ,युवक नेते प्रणव परिचारक, नगरसेवक विवेक परदेशी , नवनाथ रानगट, सचिन कुलकर्णी, श्रीनिवास बोरगावकर ,जयवंत भोसले, भाजपा तालुकाध्यक्ष भास्कर कसगावडे , राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर भोसले यांच्या हस्ते झाले. सुरूवातीला श्री विठ्ठलाचे पूजन करून करण्यात आले. याप्रसंगी शतकवीर रक्तदाते रवी लव्हेकर , रवींद्र भिंगे, शशिकांत दुनाखे यांचा सन्मान करण्यात आला.
शिबिर यशस्वी करण्यासाठी महेंद्र जोशी, समीर देशमुख, सिद्धेश्वर कोरे , गणेश पिंपळनेरकर, दत्तात्रय पवार, विठ्ठल कदम ,बाहुबली गांधी, गणेश जाधव , हेमंत कांबळे ,ईश्वर शिंदे ,महेश भोसले , सोमेश यावलकर यांनी परिश्रम घेतले.