विशेष

सोलापूर जिल्हा ग्रामीणचा कोरोना पॉझिटिव्हिटी दर 5.13 टक्के, तिसर्‍या टप्प्याप्रमाणेच या आठवड्यातही अनलॉकचे नियम कायम

सोलापूर –  कोरोनाची दुसरी लाट आता राज्यात ओसरू लागली असून अनलॉकची प्रक्रिया राबविली जात आहे. मात्र डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका असून संभाव्य तिसर्‍या लाटेची शक्यता लक्षात घेवून राज्यात दक्षता बाळगली जात असून यासाठी अनेक नियम करण्यात आले आहेत. अशा पार्श्‍वभूमीवर 28 जून पासून सुरू होणार्‍या नवीन आठवड्यात ही जिल्हा ग्रामीणमध्ये अनलॉकची स्थिती जैसे थे असणार आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीणमधील कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट  अजूनही 5.13 टक्के सोलापूर जिल्हा ग्रामीण भागात तिसर्‍या टप्प्याप्रमाणे म्हणजेच सरत्या आठवड्याप्रमाणेच सवलती आणि निर्बंध कायम राहणार आहेत. याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केला आहे.
राज्यात अ‍ॅनलॉकची प्रक्रिया 7 जूनपासून सुरू असून ज्या त्या स्थानिक प्रशासनांना तेथील परिस्थिती पाहून निर्णय घेण्याच्या सूचना देण्यात  आल्या आहेत. याचे पाच स्तर तयार करण्यात आले आहेत. सुरूवातीपासून सोलापूर जिल्हा ग्रामीण भाग तिसर्‍या टप्प्यातच आहे. पॉझिटिव्हिटी दर हा पाच टक्क्यांपेक्षा जास्त तसेच ऑक्सिजन बेडची अ‍ॅक्युपन्सी पाहता जिल्हा तिसर्‍या टप्प्यात ठेवण्यात आला होता. यामुळे सर्व दुकाने सोमवार व शुक्रवार दुपारी चारपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली होती. तर शनिवार व रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता अन्य अस्थापना बंदचा आदेश होता. सरत्या आठवड्यात 24 जूनपर्यंतचा विचार केला तर जिल्हा ग्रामीण भागाचा ( सोलापूर महापालिका वगळून) हा पॉझिटिव्हिटी रेट या 5.13 टक्के राहिल्याने या आठवड्यात ही मागील आठवड्याप्रमाणेच अनलॉकची स्थिती राहणार आहे.
या सरत्या आठवड्यात जिल्हा ग्रामीणचा पॉझिटिव्हिटी दर 5.13  टक्के असून ऑक्सिजन बेडचा ( अ‍ॅक्युपन्सी) दर ही 12.52 टक्के असल्याने ग्रामीण भागात अनलॉकची स्थिती ही मागील आठवड्याप्रमाणेच असणार आहे. सोमवार ते शुक्रवार सर्व दुकाने दुपारी चारपर्यंत सुरू राहतील तर शनिवार व रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद राहणार आहेत.

Header

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close