कारंडेवाडी जवळील अपघातामध्ये तीन ठार व नऊ जखमी
सांगोला – तालुक्यातील कारंडेवाडी फाट्याजवळ उड्डाणपुलाजवळील उजव्या बाजूस असणार्या सर्व्हिस रोडवर माल ट्रक व ओमनी कार या दोन वाहनांमध्ये झालेल्या भीसण अपघातात तीनजण ठार तर आठ जण गंभीर जखमी झाल्याची घटना 2 ऑगस्ट रोजी घडली असल्याने सांगोला पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सांगोला तालुक्यातील उदनवाडी येथील ओमनी चालक दाजीराम लक्ष्मण शिंगाडे हे उदनवाडी येथून 12 लोकांना घेऊन सिंदगी कर्नाटक येथे सायंकाळी 7 च्या सुमारास निघाले होते. कारंडेवाडी फाट्याजवळील उड्डाण पुलाजवळील उजव्या बाजूस असणार्या सर्व्हिस रोडवर या ओमनी एच.एच. 12 एच. एफ 9604 व मालट्रक एम. एच 13 सीयु 6086 या दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली. यात ओमनी चालक व त्यांच्या शेजारी असणारी लहान मुलगी कावेरी मनोज हरिजन (वय वर्ष 7 रा. निरलगी.ताळीकोटी. जि. विजापूर) जखमी होऊन मयत झाली. तसेच गुड्डी चंद्रकांत मगिरी (वय वर्ष 8 रा. कोंडगोडी ता.जेवरगी जिल्हा गुलबर्गा ) हिस उपचाराकरता पंढरपूर येथे घेऊन जात असताना उपचारापूर्वीच मयत झालेली आहे. मालट्रक चालकांविरोधात सांगोला पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.