माढा लोकसभा मतदारसंघातील हा महत्वपूर्ण रस्ता “महामार्ग”होणार ! अनेक दिवसांची मागणी मान्य
पंढरपूर – खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी काहीच दिवसापूर्वी केम रेल्वे स्टेशनच्या कार्यक्रमांमध्ये अहमदनगर वरून येणारा करमाळा- टेंभुर्णी जो रस्ता आहे तो लवकरच महामार्ग म्हणून मंजूर केला जाईल अशी घोषणा केली होती. ती आता प्रत्यक्षात साकार झालेली आहे केंद्र सरकारने जे राजपत्रात हे जाहीर केले आहे त्यामध्ये अहमदनगर – टेंभुर्णी महामार्गास मंजुरी देण्यात आलेली आहे.
याबाबतचे पत्र व परिपत्रक खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना सरकारच्यावतीने पाठवण्यात आले आहे. अहमदनगर- टेंभुर्णी हा सुमारे १४० किलोमीटरचा मार्ग असून यापैकी साठ किमी रस्ता अत्यंत खराब आहे. याची दुरुस्ती व्हावी, अशी मागणी होती. हा रस्ता रहदारीचा असून तो दोन जिल्ह्यांना तर जोडतोच परंतु माल वाहतुकीसाठी महत्वपूर्ण मानला जातो.त्यामुळे या भागातील अत्यंत महत्त्वाचा असणारा रस्ता मंजूर झालेला आहे त्यामुळे भविष्यामध्ये या भागातील व्यवसाय वाढीसाठी मदतच होणार आहे.
भारत सरकारने नुकतेच राजपत्र प्रसिद्ध केले असून यात हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून विकसित होत असल्याचे कळविले आहे. खासदार निंबाळकर यांनी यासाठी प्रयत्न केले.