राज्य

खुशखबर : पंढरपूर – फलटण रेल्वे मार्गासाठी महत्वपूर्ण माहिती !


पंढरपूर –  गेले अनेक वर्षे प्रलंबित असणार्‍या पंढरपूर ते फलटण या नवीन रेल्वे मार्गाच्या कामासाठी यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद होण्याची शक्यता आहे. रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांनी याबाबत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पत्र पाठवून कळविले आहे.
पंढरपूर- फलटण रेल्वे मार्गाला 2019 च्या सुमारास मंजुरी मिळाली होती मात्र नंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार आले व त्यांनी यासाठी राज्याचा जो खर्चाचा वाटा आहे तो उचलण्यास अनुकूलता न दर्शविल्याने योजना रखडली होती. याबाबत मागील तीन वर्षापासून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे सतत पाठपुरावा करत होते. त्यांनी केंद्राकडे ही अनेक पत्र पाठविली तसेच मंत्र्यांची भेट घेवून म्हणणे मांडले होते. ही योजना माढा लोकसभा मतदारसंघासाठी महत्वाची आहे.
अनेक वर्षांपासून पंढरपूर- फलटण रेल्वे मार्गाची मागणी होत आहे. यास केंद्राने हिरवा कंदील दाखविला आह. आता योजनेसाठी निधीची तरतूद ही केली जावू शकते, असे रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांच्या पत्रावरून लक्षात येत आहे. त्यांनी या नवीन रेल्वे लाईनच्या खर्चासाठी निधी तरतुदीच्या संबंधाने याबाबतच्या विभागाला विस्तृत माहिती घेण्याच्या सूचना केल्या असल्याचे खासदार निंबाळकर यांना कळविले आहे. यामुळे ही योजना मार्गी लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान 2024 मध्ये लोकसभा निवडणुका होत असून यापूर्वी या योजनेच्या कामाला सुरूवात झाल्यास माढा लोकसभा मतदारसंघात भाजपाला फायदा होवू शकतो. गेल्या अनेक वर्षांपासून या रेल्वे मार्गाची मागणी होत आहे. माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनीही यासाठी खूप प्रयत्न केले आहेत.

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा IT Act 2000 नुसार गुन्हा आहे.
Close
Close