राजकिय
पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक : ९२ उमेदवारी अर्ज वैध, २५ नामंजूर! पाहा वैध अर्जांची यादी
पंढरपूर – पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत १८ जागांसाठी ११७ असे विक्रमी अर्ज दाखल झाले होते. याची छाननी होवून २५ अर्ज अवैध ठरले आहेत. ९२ उमेदवारी अर्ज वैध असल्याची माहिती सहायक निबंधक कार्यालयातून मिळाली आहे. या निवडणुकीत सत्ताधारी परिचारक गटासह विठ्ठल परिवार , आ. आवताडे समर्थक, अभिजित पाटील गट, काळे गट यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान प्रशांत परिचारक यांनी विरोधकांना चर्चेचे आवाहन केले असून शेतकऱ्यांची संस्था बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.