राज्य

इर्शाळवाडी दुर्घटना : प्रशासनाच्या मदतीसाठी स्वंयसेवी संस्था व ग्रामस्थ धावले

मुंबई – दरड कोसळून दुर्घटना झालेल्या रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीत मुख्यमंत्री ( Eknath Shinde) एकनाथ शिंदे हे पहाटेपासून बचाव कार्यावर लक्ष ठेवून आहेत. त्यांनी केलेल्या आवाहनाला स्वयंसेवी संस्था तसेच परिसरातील ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अनेकजण मदतीला धावून आले आहेत.

एनडीआरएफच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक प्रशासनाच्या मदतीला यशवंती हाइकर्स, निसर्ग ग्रुप पनवेल या स्वयंसेवी संस्थेचे स्वयंसेवक तसेच मौजे चौक आणि मौजे वरोसे येथील ग्रामस्थ, विविध विभागांच्या शासकीय कर्मचाऱ्यांसह पाचशेहून अधिक मजूर सहभागी झाले आहेत. रत्नागिरीहून १० कंटेनर मागविण्यात आले आहेत.मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सकाळी केलेल्या आवाहनानंतर परिसरातील एमआयडीसीमधील असंख्य कामगार मदतीसाठी घटनास्थळी दाखल होत असून ते एनडीआरएफला बचावकार्यात मदत करीत आहेत.

रायगड जिल्ह्यातील इर्शाळगड येथे दरड कोसळण्याच्या घटनेनंतर सर्व अडथळ्यांवर मात करण्याचा प्रयत्न करत प्रशासन पूर्ण क्षमतेने मदत आणि बचाव कार्य करीत आहेत. आतापर्यंत 10 जणांचे मृतदेह आढळले आहेत. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे स्वतः पोहोचले आहेत. ज्या प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचण्यात अडचणी येत होत्या तेथे मंत्री गिरीश महाजन आणि आ. महेश बालदी हे मध्यरात्रीच पोहोचले. ते दोघेही स्वतः मदत कार्यात आहेत. पाऊस आणि हवामानामुळे मदत कार्यात अडचणी असल्या त्यातून मार्ग काढला जात आहे.
गेल्या 3 दिवसात सुमारे 499 मिमी पाऊस येथे झाला आहे. एनडीआरएफचे 60 जवान, प्रशिक्षित ट्रेकर्स सुद्धा तैनात आहेत. हवाई दलाचे दोन हेलिकॉप्टर तैनात आहेत. तथापि खराब हवामानामुळे उड्डाण घेता येत नाही. तात्पुरते हेलिपॅड उभारण्यात आले आहेत. सिडकोच्या माध्यमातून 500 कर्मचारी पाठविण्यात आले आहेत. वैद्यकीय पथके घटनास्थळी तैनात आहेत. राज्य नियंत्रण कक्ष सातत्याने स्थानिक यंत्रणांच्या संपर्कात आहे. दोन ‘अर्थ मुव्हींग मशिन’ तेथे एअरलिफ्ट करता येतात का, याचेही प्रयत्न करण्यात येत आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांनीही फोनवर संपूर्ण घटनेची माहिती घेतली असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close