विशेष

राज्यातील पाणी प्रकल्पांची स्थिती बिकट, भीमा निरा खोऱ्यातील धरण ही तळ गाठू लागली

पंढरपूर – 2023 मध्ये झालेल्या कमी पावसामुळे राज्यातील सर्व मोठ्या प्रकल्पांमधील पाणीसाठे यंदा मे महिन्याच्या मध्यालाच खालावले असून 138 धरणांमध्ये 23.87% इतका पाणीसाठा सध्या शिल्लक आहे .गतवर्षी याच तारखेला याच प्रकल्पांमध्ये 35.85% पाणी शिल्लक होते.
राज्यातील मध्यम प्रकल्पांमध्येही 13 टक्के पाणी 2023 च्या तुलनेत कमी आहे. सध्या 260 मध्यम योजनांमध्ये सरासरी 35.17% पाणी असून गतवर्षी ते 48.77% इतके शिल्लक होते. तर महाराष्ट्रातील 2596 लघु प्रकल्पांमध्ये केवळ 27% जलसाठा यंदा शिल्लक आहे, जो गतवर्षी 36 %इतका होता.
राज्यातील सर्व 2994 प्रकल्पांमध्ये सध्या सरासरी 35.88% जलसाठा आहे. जो गतवर्षीच्या तुलनेत 13 टक्क्यांनी कमी आहे. भीमा व निरा खोऱ्यात 2023 च्या पावसाळ्यात कमी पाऊस झाल्याने धरणांमधील पाणीसाठे अत्यंत खालावले आहेत. 12 मे रोजी निरा देवघर प्रकल्पात 14.34% , भाटगर मध्ये 9.22% ,गुंजवणी 20.60% तर वीर धरणात 18.63% इतका जलसाठा शिल्लक होता. दरम्यान निरा खोऱ्यातील पाण्यावरून सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये आंदोलन सुरू झालेली आहेत.
भीमा खोऱ्यातील धरणांचा जर विचार केला तर उजनी उजनी धरण वजा 47% अशा स्थितीत आहे. गतवर्षी हे धरण सहा मे ला वजा पातळीत गेले होते. मात्र 2024 मध्ये उजनी मार्च महिन्यात वजा पातळीत पोहोचले आहे .भीमा खोऱ्यातील धरणांमधील पाणघ साठा – भामा आसखेड प्रकल्पात 23 टक्के , येडगाव 14% ,चासकमान 10, घोड 2.90 ,पवना 26.28, खडकवासला 54.39, पानशेत 20.26 , टेमघर 5.17 , मुळशी टाटा 24.49% भरलेले आहे.
राज्यातील महत्त्वाच्या धरणांचा विचार केला तर कोयना प्रकल्पात 25.55% ,राधानगरी 26.39% , दूधगंगा 14.28 यासह अहमदनगर मधील भंडारदरा 17.47 , मुळा 9.60 , उर्ध्वतापी 41.27, गंगापूर 44.8 , गिरणा 21.36. तसेच हिंगोली मधील सिद्धेश्वर शून्य टक्के, येलदरी 29.69 , निम्न दुधना 1.49% भरलेले आहे.

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा IT Act 2000 नुसार गुन्हा आहे.
Close
Close