राजकिय

खा. निंबाळकर यांच्यावर भाजपा ने टाकली  पुणे लोकसभेची जबाबदारी

पंढरपूर –  माढा लोकसभेचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मतदारसंघात आता मतदान पार पडल्याने पक्षाने त्यांची पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निरीक्षक पदी नियुक्ती केली आहे त्यांना तातडीने संघटनात्मक कामामध्ये सहभागी होण्यास सांगण्यात आले आहे.


याबाबतचे पत्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाईक निंबाळकर यांना दिले आहे. सात मे रोजी माढा लोकसभा मतदारसंघातील मतदान पार पडले असून यानंतर दोनच दिवसात भाजपने निंबाळकर यांना पुणे लोकसभा मतदारसंघांमध्ये निरीक्षक म्हणून पाठवले आहे. पुण्याची निवडणूक मोठ्या चुरशीची होत असून तेथे भाजपचे मुरलीधर मोहोळ व काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यात सरळ लढत होत आहे. आता निंबाळकर पुणे लोकसभा मतदारसंघातील मतदान होईपर्यंत पुण्यामध्येच थांबून निरीक्षकपदाची जबाबदारी पार पाडणार आहेत.
2021 मध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपने पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निरीक्षकपदी नियुक्त केले होते. तेव्हा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतानाही भाजपचे समाधान आवताडे हे पंढरपूर मधून विजयी झाले होते. त्यावेळी निंबाळकर यांनी पंढरपूरमध्ये राहून या निवडणुकीची सूत्र हाती घेतली होती. आता भाजपाने त्यांच्यावर पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निरीक्षक पदाची जबाबदारी टाकली आहे.

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close