विशेष

तीन दिवसात उजनीत “16 टीएमसी” पाणी वाढले, भीमा खोर्‍यातील पावसाने दिला “हात”


पंढरपूर –  मागील तीन दिवसात म्हणजेच 22 ते 25 जुलै दरम्यान भीमा खोर्‍यातील मुसळधार पावसामुळे सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणार्‍या उजनी धरणात 16.36 टीएमसी पाणी वाढले आहे. अद्यापही दौंडजवळून 25 हजार 407 क्युसेक पाणी जलाशयात मिसळत असले तरी आता आवक मंदावत आहे.
भीमा व नीरा खोर्‍यात मागील तीन दिवसांपासून सुरू असणारा पाऊस शनिवारपासून कमी झाला असल्याने धरणांचे विसर्ग कमी करण्यात आले आहेत. यामुळे दौंडजवळून उजनीत मिसणारा पाण्याचा विसर्ग रविवारी सायंकाळी  सहा वाजता कमी होवून 25 हजार 407 क्युसेक इतका झाला आहे. उजनी धरण 30.54 टक्के उपयुक्त पातळीत भरले आहे.
खडकवासला धरणातून पाणी सोडणे कमी केल्याने पुणे बंडगार्डनचा विसर्ग 14 हजार 545 इतका मंदावला आहे. उजनीत आता एकूण पाणीसाठा हा 80.02 टीएमसी इतका झाला असून यात उपयुक्त पाणी 16.36 टीएमसी इतके आहे. हे धरण 22 जुलै रोजी उपयुक्त पातळीत भरण्यास सुरूवात झाली आहे. पुणे भागातील पावसाने साथ दिल्याने ते झपाट्याने वधारत आहे.
या पावसाळा हंगामात उजनी धरणात एकूण 53 टक्के पाणी जमा झाले असून 2 जून 2020 ला हा प्रकल्प वजा 22.32 टक्के अशा स्थितीत होता. यानंतर पावसाने ते भरण्यास सुरूवात झाले होते. 22 जुलै पर्यंत ते मृतसाठ्यातच होते. उजनीवर या हंगामात एकूण 246 मि.मी. पाऊस झाला आहे.

Header

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close