सिताराम साखर कारखाना पंधरा दिवसाला ऊसबिल देणार
पंढरपूर – सिताराम महाराज कारखान्याकडे गाळपास आलेल्या उसास एफआरपी प्रमाणे ऊसदर प्रत्येक पंधरवड्यास दिला जाईल तसेच शेतकर्यांनी त्यांचा ऊस इतर कोणत्याही काटयावरुन वजन करावा व खात्री करून येथे आणावा ,असे आवाहन या कारखान्याचे मार्गदर्शक व धनश्री परिवाराचे प्रमुख शिवाजीराव काळुंगे यांनी केले.
खर्डी येथील सिताराम महाराज साखर कारखान्यात गाळप हंगाम 2021-22 चा अकरावा बॉयलर अग्निप्रदीपन जयवंत बोधले महाराज करण्यात आले. यावेळी सद्गुरू कारखान्याचे शेषगिरीराव, रामचंद्र केदार , भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत, कारखान्याच्या अध्यक्षा शोभा शिवाजीराव काळुंगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजलक्ष्मी गायकवाड- काळुंगे, संचाल महादेव देठे, सांगोला सूतगिरणीचे अध्यक्ष नानासाहेब लिगाडे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
2021-22 च्या गळी हंगामासाठी कारखाना सज्ज असून पाच लाख टन ऊस गाळपाचे उदिष्ट असल्याचे राजलक्ष्मी गायकवाड यांनी सांगितले.