राज्य

पंतप्रधानांशी भीमा स्थिरीकरण, पंढरपूर-फलटण रेल्वेसह विविध योजनांबाबत चर्चा



पंढरपूर, –  माढा  लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह रयत क्रांतीचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत व आमदार जयकुमार गोरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंढरपूर-फलटण रेल्वे, कृष्णा भीमा स्थिरीकरण, निरा देवघर प्रकल्प तसेच कठापूर योजनेसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
माढा मतदारसंघातील फलटण ते पंढरपूर नवीन रेल्वे मार्ग मंजुरी व निधी उपलब्ध होवून याच्या कामास प्रारंभ करण्याबाबत यावेळी आग्रही चर्चा झाली.  या योजनेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मंजुरी मिळाली होती व याच्या खर्चात निम्मा वाटा राज्य सरकार उचलणार हे निश्‍चित करण्यात आले होते. मात्र सध्याचे महाविकास आघाडी सरकार यास निधी देत नसल्याने केंद्रानेच यावर मार्ग शोधण्याची विनंती पंतप्रधानांना करण्यात आली.
पंतप्रधान मोदी ब यांच्या जिव्हाळ्याचा  विषय असणारा जिहे-कठापूर (गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन प्रकल्प) अंतिम टप्प्यात आला असून तो पूर्ण करण्यासाठी आवश्यक तो निधी देण्याचे पंतप्रधानांनी आश्‍वासित केले. निरा देवघर प्रकल्प आणि कृष्णा-भीमा स्थिरीकरण (नदी जोड प्रकल्प) याबाबतही पंतप्रधानांना सविस्तर माहिती देण्यात आली. स्थिरीकरणामुळेम दुष्काळग्रस्त सातारा, सांगली, मराठवाडा या भागाचा प्रश्‍न मिटणार असल्याचे खासदार निंबाळकर यांनी सांगितले.  यावेळी त्यांनी दुष्काळात पश्‍चिम महाराष्ट्रातून मराठवाड्यात रेल्वेतून पाणी नेण्याची वेळ आली होती याची आठवण करून दिली. यासाठी हा प्रकल्प राबविण्याचा आवाहन केले.  यास निधी तातडीने पावले उचलली जातील असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
केंद्र सरकारने सादर केलेल्या बजेटमध्ये शेतकर्‍यांचा शेतमाल खरेदी करणे, बजेट फार्मिंग योजना कार्यान्वित करणे, पिकांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनची व्यवस्था करणे, शेतमाल अधिक वेगाने बाजारपेठेत पोचवण्यासाठी रेल्वेचे जाळे आखणे, शेतीमध्ये आधुनिकीकरण करण्यासाठी कृषी महाविद्यालय स्थापण करणे, स्टार्टअप योजनेअंतर्गत नाबार्डच्या माध्यमातून कर्जपुरवठा करण्यासाठी तरतूद केल्याने सदाभाऊ खोत यांनी पंतप्रधानांचे यावेळी आभार मानले.
केंद्रतील सरकार हे निश्‍चितपणाने शेतकर्‍यांना प्रगतिपथावर घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशिल राहिल तसेच शेती हा एक उद्योग म्हणून भरभराटीला कसा येईल या दृष्टीने हे सरकार काम करेल, असे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.

Header

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close