गळीत हंगामापूर्वी सहकार शिरोमणी थकीत ऊसबिल देणार , नव्या हंगामात कारखाना सुरु करण्याची तयारी पूर्ण
पंढरपूर – भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचा सन 2021-22 चा गळीत हंगाम सुरु करण्यासाठी तयारी पूर्ण झालेली आहे. मागील हंगामात गळीतासाठी आलेल्या उसाची उर्वरित बिलाची रक्कम लवकरच अदा करण्यात येणार असून त्यासाठी पूर्वीच्या कर्जास शासकीय थकहमीचा प्रस्ताव शासनाकडे दाखल करण्यात आला असून तो मंजुरीच्या अंतिम टप्यात आहे. गळीत हंगाम सुरु करण्यापुर्वी शेतकऱ्यांच्या उसाची बिलाची रक्कम अदा करण्यात येणार आहे.
कारखान्याचे मशिनरी दुरुस्तीचे काम अंतिम टप्यात आले आहे. ऊस वाहतुकीसाठी 200 वाहनांचा करार करण्यात आला असून त्यांना पहिला हप्ता वाटप करण्यात आला आहे अशी माहिती अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी दिली.
कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीत यंदाच्या गळीत हंगामात पूर्ण क्षमतेने कारखाना चालविण्याचा निर्धार करण्यात आला असून मागील हंगामात गळीतासाठी आलेल्या उसाची उर्वरीत बिलाची रक्कम लवकरच अदा करण्यात येणार असून त्यासाठी पूर्वीच्या कर्जास शासकीय थकहमीचा प्रस्ताव शासनाकडे दाखल करण्यात आला असून तो मंजुरीच्या अंतिम टप्यात आहे. गळीत हंगाम सुरु करण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या उसाची बिलाची रक्कम अदा करण्यात येणार आहे. चालू हंगामासाठी आवश्यक असणाऱ्या 200 वाहनांचा तसेच आवश्यक बैलगाडी व बज्याट यांचेही करार करण्यात आले असून त्यांना पहिल्या हप्त्याची रक्कम वाटप करण्यात आली आहे. गत हंगामातील वाहतुकदारांचे कमिशन ,डिपॉझिट त्यांना अदा करण्यात आले आहे. तर कर्मचऱ्यांच्या पगार नियमित सुरु आहेत.
कारखाना सुरु करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या माल पुरवठादारांची बैठक घेवून माल खरेदीच्या ऑर्डर देण्यात आल्या आहेत. यंदाच्या गळीत हंगामामध्ये गाळपास येणाऱ्या तालुक्यातील उसाची मोठया प्रमाणात नोंद झाली असून पूर्ण क्षमतेने उसाचे गाळप करुन सहवीज निर्मिती प्रकल्प व डिस्टलरी प्रकल्प यातूनही उत्पादन वाढविण्यासाठी संचालक मंडळाचे प्रयत्न सुरु राहतील असे काळे यांनी सांगितले.