अभिमानास्पद, 112 वर्षाचा वालचंदनगर उद्योग समूह करतोय मेडिकल ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांचे उत्पादन, अनेक राज्यांना पुरवठा
वालचंदनगर उद्योग समूह हा इंदापूर तालुक्यात असून 112 वर्षापासून तो देशाच्या उद्योग उभारणीत आपले योगदान देत आला आहे. कंपनी सध्या ऐरोस्पेस,मिसाईल,संरक्षण, अणूउर्जा,पाणबुडीचे गुंतागुंतीचे गिअर बॉक्स निर्मिती करत आहे. वालचंदनगर कंपनीने तयार केलेल्या मेडिकल ऑक्सिजन प्रकल्पामामध्ये वातावरणातील हवा कॉम्प्रेशरच्या सहाय्याने घेवून त्यातील आद्रता काढली जाते. मशीनद्वारे रसायनाचा वापर करुन शुद्ध ऑक्सिजन निर्मिती होते. याच्या शुध्दीकरणाचे प्रमाण 93 ते 96 टक्के असून याचा उपयोग रुग्णासाठी केला जातो. तसेच हा मेडिकल ऑक्सिजन टाक्यांमध्ये साठवून ठेवता येतो.
वालचंदनगर कंपनीने विकसित केली 500 लीटर प्रतिमिनिट ऑक्सिजन निर्मितीची तंत्रज्ञानामुळे 93 ते 96 टक्के शुद्ध ऑक्सिजनची निर्मिती होत असून याचा कोरोना विरोधातील लढ्यासाठी होणार उपयोग होणार असून याचे वेगाने उत्पादन घेतले जात असल्याचे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक चिराग दोशी यांनी सांगितले.
कोरोनाच्या तिसर्या लाटेचा संभाव्य धोका पाहता व देशात ऑक्सिजनची कमरता जाणवू नये यासाठी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांची उभारणी वेगाने होत आहे. याच अंतर्गत वालचंदनगर (ता.इंदापूर) येथील कंपनीने मेक इन इंडियातंर्गत प्रति मिनिट 500 लीटर मेडिकल ऑक्सिजन निर्मितीच्या प्रकल्पाचे तंत्रज्ञान विकसित केले आहे.
कोरोनाच्या दुसर्या लाटेमध्ये अचानक ऑक्सिजनची टंचाई जाणवू लागल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण आला होता. वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्यामुळे अनेक रुग्णांचे हाल झाले . 112 वर्षापासून देशउभारणीच्या कामामध्ये मोलाचे योगदान देणार्या वालचंद उद्योग समूहाने या कोरोना विरोधातील लढ्यामध्ये योगदान दिले असून येथे कंपनीने सॅनिटायझेशन टँक, व्हेटिंलेटर व मेडिकल ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाची यशस्वी निर्मिती केली आहे.
मेडिकल ऑक्सिजन निर्मितीच्या प्रकल्पासाठी संरक्षण व संशोधन विकास संस्था (डीआरडीओ) व पंतप्रधान सहायता निधीने मदत केली आहे. वातावरणातील हवा घेवून त्यापासून 250 व 500 लीटर प्रतिमिनिट ऑक्सिजन निर्मिती बनविण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. दहा प्रकल्प नागालँड, त्रिपुरा, झारखंड व राजस्थानमधील हॉस्पिटलसाठी पंतप्रधान सहायता निधीतून देण्यात आले आहेत. यावेळी जनरल मॅनेजर धीरज केसकर, एकनाथ पेठे उपस्थित होते.