विशेष

पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील विविध रस्त्यांसाठी 75 कोटी ₹ निधी – आमदार समाधान आवताडे

पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील विविध भागांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या मजबुती व सुधारणा करणे कामांसाठी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील रस्त्यांसाठी 75 कोटी रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली.    

 पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील दळणवळण सुविधेच्या अनुषंगाने विविध रस्ते गेल्या अनेक दिवसांपासून मजबूत व दुरुस्त करणे अतिशय गरजेचे झाले होते. सदर रस्त्यांच्या आजूबाजूला वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांच्या व विद्यार्थ्यांच्या प्रवास मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी हे रस्ते सुधारित करण्यात यावेत यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी संबंधित विभागाकडे या रस्त्यांसाठी आर्थिक तरतूद करण्याची मागणी पत्राद्वारे केली होती. आमदार आवताडे यांनी केलेल्या या मागणीची राज्य पातळीवर दाखल घेऊन हा निधी मंजूर झाल्याने या रस्त्यांचा कायापालट होण्यास खूप मोठी झाली आहे.

          पंढरपूर – मंगळवेढा तालुक्यातील मंजूर असलेले रस्ते – कागष्ट ते हुलजंती रस्ता मध्ये सुधारणा करणे, खर्डी ते तपकिरी (शे) रस्ता सुधारणा करणे, गुंजेगाव ते लक्ष्मी दहिवडी रस्ता सुधारणा करणे, माचणूर ते रहाटेवाडी रस्ता सुधारणा करणे, बोराळे ते मंगळवेढा रस्ता सुधारणा करणे, बाजीराव विहीर – गादेगाव – कोर्टी – बोहाळी – खर्डी – तनाळी रस्ता सुधारणा करणे, आंधळगाव ते पाटखळ रस्ता सुधारणा करणे, खर्डी – तावशी – एकलासपूर रस्ता सुधारणा करणे, भालेवाडी – डोणज – नंदुर रस्ता सुधारणा करणे, भोसे – रड्डे – निंबोणी – मरवडे रस्ता सुधारणा करणे, हाजापूर – जुनोनी – हिवरगाव ते तळसंगी रस्ता सुधारणा करणे, कासेगाव ते तावशी रस्ता सुधारणा करणे, ब्रह्मपुरी – मुंढेवाडी – भालेवाडी रस्ता सुधारणा करणे, कासेगाव ते टाकळी विसावा रस्ता सुधारणा करणे, जालिहाळ ते भाळवणी रस्ता सुधारणा करणे, कासेगाव ते तपकिरी शेटफळ रस्ता दुरुस्ती करणे, बठाण ते साखर कारखाना रस्ता सुधारणा करणे, तनाळी ते शेटफळ रस्ता सुधारणा करणे, हुलजंती ते सलगर खु – सलगर बु – उमदी रस्ता दुरुस्ती करणे, उपरी ते गादेगाव रस्ता सुधारणा करणे, लक्ष्मी दहिवडी ते प्ररामा रस्ता सुधारणा करणे, कोर्टी ते माळीवस्ती रस्ता सुधारणा, हिवरगाव ते भाळवणी रस्ता सुधारणा करणे, कौठाळी चौफाळ ते धुमाळ वस्ती रस्ता सुधारणा करणे, लेंडवे चिंचाळे ते आंधळगाव रस्ता सुधारणा करणे, सलगर बु ते भुयार रस्ता सुधारणा करणे, तांडोर ते प्रतिमा रस्ता सुधारणा करणे, नंदुर ते बोराळे रस्ता सुधारणा करणे, येळगी ते प्ररामा रस्ता सुधारणा करणे, मरवडे ते कालिबाग वस्ती रस्ता सुधारणा करणे, नंदेश्वर ते शिरसी रस्ता सुधारणा करणे, भोसे ते शिरनांदगी रस्ता सुधारणा करणे, खोमनाळ ते फटेवाडी रस्ता सुधारणा करणे, हुलजंती ते येळगी रस्ता सुधारणा करणे, चिक्कलगी ते येळगी रस्ता सुधारणा करणे, डोंगरगाव ते खोमनाळ रस्ता सुधारणा करणे, भागवत माने वस्ती ते मारापूर रस्ता सुधारणा करणे

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा IT Act 2000 नुसार गुन्हा आहे.
Close
Close