राज्य

माळशिरस तालुक्यासाठी 139 कोटी रूपये मंजूर  


पंढरपूर – माळशिरस विधानसभा मतदारसंघातील विविध रस्ते व बांधकाम यासाठी 106 कोटी 66 लाख रू.तर रखडलेल्या रस्त्यांसाठी, दुरूस्ती देखभाल व ल.पा.तलाव,  तलाठी कार्यालय याकरिता 32 कोटी 12 लाख  49 हजार असे एकूण 139 कोटी 78 लक्ष 49 हजार रूपये विविध विकास कामांकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प अधिवेशन 2023 मध्ये मंजूर  केले असल्याची माहिती आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी दिली.
तसेच आ.मोहिते-पाटील यांनी तालुक्याच्या पायाभूत सुविधेच्या विकासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे तालुक्यातील जनतेच्यावतीने आभार मानले आहेत. मांडकी, निमगाव, पिरळे, पळसमंडळ खोरोची कन्हेर, बागेचीवाडी, सदाशिवनगर, पठाणवस्ती, तांदुळवाडी, भांबुर्डी, धानोरे, खुडूस, विजयवाडी, बोंडले, , बचेरी, काळमवाडी, गारवड, कचरेवाडी, बाभूळगाव कुरबावी, मारकडवाडी, इस्लामपूर, वेळापूर, कोथळे, भांब, गिरझणी, कोंडबावी सदाशिवनगर, खंडाळी, इस्लामपूर, वेळापूर माळीनगर, खंडाळी, कळंबोली या गावांच्या पायाभूत सुविधांच्या विकासाठी आ. मोहिते-पाटील यांनी शासनदरबारी वेळोवेळी पाठपुरावा केला होता.
तालुक्यातील विविध गावांतील रखडलेल्या रस्त्यांसाठी, रस्ते विकासाठी, लघु पाटबंधारे तलाव, तलाठी कार्यालय,विश्रामग्रह यासाठी तब्बल 139 कोटींची तरतूद अर्थसंकल्पात केली गेल्याने दळणवळ-वाहतूक  सुकर होणार असून विकासला चालना मिळणार आहे. यासाठी माळशिरस तालुक्यातील जनतेने आ.मोहिते-पाटील यांचे आभार मानले आहेत.

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close