सामाजिक

बापानेच केला मुलाचा गळा दाबून खून !

अकलूज – मुलगा चो-या करतो, त्याला गुटख्याचे व्यसन आहे. त्यामचळे आपली समाजात बदनामी होतेय. म्हणून जन्मदात्या पित्यानेच आपल्या मुलाचा गळा दाबून खून केल्याची घटना आकलूज येथे घडली आहे.

याबाबत हकीकत अशी की, प्रशांत अर्जुन सावंत (रा. डॉ. आंबेडकर चौक, अकलूज) यांनी त्यांचा मुलगा अलोक (वय 12 वर्ष) यांचा गळा दाबून खून केला आहे. अलोट हा नेहमी गुटखा खात होता. लहान वयात व्यसन करत होता. तसेच यापूर्वीही त्याने दोन वेळा चोऱ्या केल्या होत्या. याबाबत त्यांना याची भरपाई द्यावी लागली होती. तसेच त्याने आजही चोरी केल्याची कबुली दिल्याने व घराची बदनामी झाली म्हणून आरोपी याने मुलास तुला खाऊ देतो असे म्हणून त्यास घराबाहेर श्रीराम थिएटर जवळ असणाऱ्या काटेरी झुडपांमध्ये नेऊन चिडून जाऊन त्याचा गळा दाबून खून केला.याबाबत प्रशांत सावंत यांची पत्नी भारती सावंत यांनी अकलूज पोलिसांकडे फिर्याद नोंदवली आहे. आरोपीस अटक करण्यात आली सून अधिकचा तपास सहायक पोलीस निरीक्षक वैभव मारकड हे करत आहेत.

Header

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा IT Act 2000 नुसार गुन्हा आहे.
Close
Close