Uncategorized

ओव्हरलोड वाहतूक करणार्‍या तीस ट्रॅक्टर्सवर कारवाई, कडक कारवाईचे वायूवेग पथकांना आदेश

जरुर हा व्हीडिओ पाहा, पालक व विद्यार्थ्यांसाठी तर खूपच उपयुक्त

पंढरपूर –  सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी उसाला प्रतिटन 3100 रूपये एकूण दर तर पहिली उचल 2500 रूपये द्यावी ,या मागणीसाठी ऊसदर संघर्ष समितीने आंदोलन सुरू केले असून त्यांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात ओव्हरलोड ऊस वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाईची मागणी केली होती व  यासाठी कार्यालयातच आंदोलन केले होते. दरम्यान आरटीओंनी यांनी 30 वाहनांवर कारवाई केली असून वायूवेग पथकांना ही मोटार वाहन कायद्यानुसार अशा वाहनांवर कारवाईचे आदेश दिले आहे.
याबाबतचे पत्र  उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी ऊस दर संघर्ष समितीला दिले आहे. दरम्यान जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन वाढत चालले आहे. ऊसदर जाहीर न करताच कारखाने सुरू झाल्याने शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. यासाठी विविध प्रकारची आंदोलन होत आहे. कारखान्यांकडे ऊस घेवून जाणारी वाहनं ही ओव्हरलोड असतात हे आजवर दिसून आले आहे. यामुळेच संघर्ष समितीने त्यांच्यावरच कारवाईची मागणी केली आहे. या समितीने अगोदर गांधीगिरीची आंदोलन करून वाहन चालक व मालकांना ऊस वाहतूक रोखण्याची विनंती केली होती. ती त्यांनी मान्य न केल्याने आता आरटीओंकडे ओव्हरलोड वाहनांवर कारवाईची मागणी करण्यात आली होती. 

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close