राज्य

भाई गणपतराव देशमुख पंचतत्वात विलीन ,शासकीय इतमामात सांगोल्यात अंत्यसंस्कार


सांगोला, दि.31 – महाराष्ट्राच्या राजकारणामधील भिष्माचार्य शेतकारी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई गणपतराव देशमुख यांच्या पार्थिवावर शेतकरी सहकारी सूत गिरणीच्या प्रांगणात शनिवारी दुपारी तीन वाजता शासकीय इतमामात व हजारो जनसागराच्या उपस्थित विधीवत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पुत्र पोपट देशमुख व चंद्रकांत देशमुख यांनी भडाग्नी दिला.
यावेळी यांची कन्या शोभा पाटील, नातू डॉ.अनिकेत देशमुख व डॉ.बाबासाहेब देशमुख हे उपस्थित होते. याप्रसंगी शोकसभेत पालकमंत्री दत्तात्रय भरणे, सुमन पाटील, अनिल बाबर, प्रशांत परिचारक, शहाजी पाटील, शेकापचे जयंत पाटील या विद्यमान आमदारांसह माजी मंत्री अण्णा डांगे, माजी आमदार रामहरी रुपनवर, दीपक साळुंखे पाटील, प्रकाश शेंडगे, उत्तम जानकर, वैभव नाईकवाडी यांनी के.गणपतराव देशमुख यांच्या कार्याचा गौरव केला. तसेच विधानमंडळातील आठवणी सांगितल्या. विधानसभेतील मार्गदर्शक हरपला अशा भावना  त्यांनी व्यक्त केल्या. दत्ता भरणे यांनी शेकापचे नेते आमदार जयंत पाटील यांच्या सूचनेवरून गणपतराव देशमुख यांच्या नावाने शासकीय योजना सुरू केली जाईल अशी ग्वाही दिली.
गणपतराव देशमुख यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी पोलिसांनी फैरी झाडून मानवंदना दिली. याप्रसंगी कै. गणपतराव देशमुख यांचा मृतदेह ज्या तिरंग्या झेंड्यात लपेटण्यात आला होता तो ध्वज त्यांच्या पत्नी रतनबाई देशमुख यांच्याकडे पालकमंत्री भरणे यांनी सुपुर्द केला. त्यानंतर पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते, नगराध्यक्षा राणी माने व उपस्थित असलेले विद्यमान व माजी आमदार तसेच पदाधिकारी यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आली. उपस्थित जनसमुदायाने आबासाहेब अमर रहे, आबासाहेब परत या, परत या.. अशा दिल्या
याप्रसंगी रणजितसिंह मोहिते पाटील, समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, महादेव जानकर, गोपीचंद पडळकर या आमदारांसह  माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार राजेंद्र देशमुख, धैर्यशील मोहिते-पाटील, माजी मंत्री प्रकाश शेंडगे, सांगलीचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी उपस्थित होते.
सांगोल्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची वार्ता सर्वत्र पसरताच जिल्ह्यातून तालुक्यातून नेते व हजारो कार्यकर्त्यांनी येथे दर्शन घेण्यास पहाटे पाच वाजल्यापासून गर्दी केली होती. पोलीस प्रशासन यांनी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवला होता. महसूल प्रशासनाने अंत्यविधीची तयारी केली होती.
कै. गणपतराव देशमुख यांचे पार्थिव सोलापूरहून सांगोलाकडे आणताना त्यांच्या मूळ गावी मोहोळ तालुक्यातल पेनूर येथे थांबवण्यात आले. त्याप्रसंगी शेकडो लोकांनी पुष्पवृष्टी करून दर्शन घेतले. त्यानंतर खर्डी, संगेवाडी, मांजरी, बामणी, देशमुख वस्ती येथे कार्यकर्त्यांनी त्यांना अभिवादन करून आपल्या लाडक्या नेत्याचे दर्शन घेतले.
सकाळी साडेनऊ वाजता पार्थिव सांगोला शहरात पोहोचले होते. कृषी उत्पन्न बाजार समितीपासून अंत्ययात्रेला सुरुवात झाली. रस्त्याच्या दुतर्फा आबासाहेबांवर प्रेम करणार्‍या कार्यकर्त्यांनी अलोट गर्दी केली होती. पंचायत समिती तहसील कार्यालय कच्ची रोड, अण्णाभाऊ साठे पुतळा, जय भवानी चौक, नगरपरिषद मार्गे अंत्ययात्रा त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्यावर त्यांचे पार्थिव देह घरात नेऊन विधीवत धार्मिक कार्यक्रम करण्यात आले.
यावेळी माजी मंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आमदार बबनराव शिंदे, मनोहरभाऊ डोंगरे, माजी मंत्री राम शिंदे, आमदार शहाजी पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांचे सह मान्यवरांनी पुष्पहार घालून त्यांचे दर्शन घेतले. त्यावेळी पोलिसांतर्फे धून वाजून त्यांना शासकीय श्रद्धांजली वाहण्यात आली.
त्यानंतर सजवलेल्या रथातून त्यांचे पार्थिव महात्मा फुले चौक येथून मिरज रेल्वे गेट, सूत गिरणी या ठिकाणी आणण्यात आले. शेतकरी सहकारी व महिला सूतगिरणी या दोन्ही संस्थेच्या वतीने संचालकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर अंत्यसंस्काराच्या ठिकाणी पार्थिव देह संस्काराच्या  नेण्यात आला. यावेळी सूतगिरणीचे अध्यक्ष प्रा.नानासाहेब लिगाडे, सभापती राणीताई कोळवले, संगीता धांडोरे, पांडुरंग जाधव, गोविंद जाधव, गिरीश गंगथडे, बाळासाहेब एरंडे, मारुती बनकर, नारायण जगताप, बाळासाहेब काटकर, बाबा कारंडे, बाबुराव गायकवाड, शिवाजीराव गायकवाड, नागेश जोशी, श्रीकांत देशमुख, तानाजी पाटील, प्रा.पी.सी.झपके, प्रभाकर चांदणे, अ‍ॅड.सचिन देशमुख, विशाल बाबर, अमोल खरात, दादासाहेब जगताप, अजित गावडे, कल्पना शिंगाडे, अवधूत कुमठेकर यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी रडत रडत आपल्या भावना व्यक्त केल्या.

Header

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close