राजकिय

के.सी.आर यांच्या भेटीसाठी भगीरथ भालके विशेष विमानाने हैद्राबादला रवाना , बीआरएस प्रवेशाबाबत काय निर्णय होणार ?

पंढरपूर – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पंढरपूरचे नेते भगीरथ भारत भालके हे तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या बी आर एस या पक्षात जाण्याच्या तयारी असून ते आज पुण्यातून विशेष विमानाने हैदराबाद या ठिकाणी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्याकरता गेले आहेत.
गेल्या काही दिवसापासून पंढरपूर राष्ट्रवादीमध्ये धुसफूस सुरू असून राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत गेल्या काही दिवसापूर्वी विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता. यानंतर भगीरथ भालके हे नाराज असले चर्चा होते सध्या राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे हे त्यांच्या सहकार शिरोमणी कारखान्याच्या निवडणुकीमध्ये व्यस्त असून त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ बुधवारी सकाळी होत आहे. यास भालके यांची उपस्थिती अनिवार्य होती. मात्र तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी दिलेल्या आमंत्रणानुसार ते मंगळवारी दुपारी सोलापूरहून हैदराबादला जाणार होते, मात्र हैदराबादहून आलेली विमान सोलापूर न शकल्याने बुधवारी सकाळी भगीरथ भालके हे सहकुटुंब हैदराबादला निघाले. बी आर एस पक्षाचे नेते शंकरराव धोंगडे हे आज पंढरपूर मध्ये दाखल झाले होते.त्यांनीही पत्रकारांशी बोलताना बालके हे बी आर एस पक्षांमध्ये येत असल्याचे सुतोवाच केले होते. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये भगीरथ भालके यांनी आपण पक्षात प्रवेश अद्याप केलेला नसला तरी हे चंद्रशेखर राव यांची ध्येयधोरण त्यांनी शेतकऱ्यांविषयी केलेलं काम हे पाहण्यासाठी हैदराबाद या ठिकाणी जात आहोत ,असे स्पष्ट केले. भगीरथ भालके हे राष्ट्रवादीचे नेते असून त्यांनी 2021 ची पंढरपूरची पोट निवडणूक लढवली होती व एक लाख 5000 पेक्षा जास्त मते घेतली होती यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असलेली धूसफूस व विठ्ठल कारखाना निवडणुकीमध्ये भालके यांचा झालेला पराभव पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पंढरपूर मध्ये पर्याय म्हणून अभिजीत पाटील यांना प्राधान्य दिले. पक्षाचे नेते खासदार शरद पवार तसेच त्यांचे नातू आमदार रोहित पवार यांनीही अभिजीत पाटील यांना ताकद दिली. यानंतर पंढरपूर राष्ट्रवादी मध्ये खळबळ उडाली होती. व आता भालके यांनी राष्ट्रवादी सोडून इतर पक्षांशी संधान साधण्यास सुरुवात केली आहे असे स्पष्ट होत आहे. सोमवारी त्यांनी मंगळवेढा येथे भव्य मोर्चाचे आयोजन केलं होतं.या मोर्चात शेतकरी प्रश्नांवर आवाज उठवण्यात आला तसेच पाणी प्रश्न ऐरणीवर आणण्यात आला. यामुळे भालके हे बीआरएस पक्षात जाणार असे मानले जाते यातच या पक्षाचे नेते शंकरराव धोंगडे हे पंढरपूरला आले होते. आता भालके हे त्यांच्यासमवेत पुण्याला जाऊन तेथून विमानाने हैदराबाद येथे जाऊन तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखरराव यांच्याशी चर्चा करणार आहेत के चंद्रशेखर राव यांनी तेलंगणामध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या असून त्यांचे काम पाहून महाराष्ट्रातील अनेक नेते हे बी आर एस पक्षात येण्यास तयार असल्याचे धोंगडे यांनी यावेळी सांगितले.

Header
Tags

Related Articles

Back to top button
Close
Close