राज्य

पंढरपूर दौर्‍यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोहिते पाटील व परिचारकांशी जपला जिव्हाळा

पंढरपूर –  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी पंढरपूरला आले असता त्यांनी भाजपाचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जाणार्‍या आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्याची जिव्हाळा जपला. शिंदे यांचे चिरंजीव खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे अकलूजला शिवरत्न बंगल्यावर गेले होते तर पंढरीत एकनाथ शिंदे हे परिचारकांच्या पंतनगरमधील कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित राहिले.
पंतनगरच्या कार्यक्रमात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे स्वतः उपस्थित होते. एकादशी दिवशी सकाळी आयोजित या कार्यक्रमास भाजपामधील अनेक नेत्यांची हजेरी लावली होती. येथे बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी कोल्हापूर भागातील पश्‍चिम वाहिनी नद्यांमधील समुद्राला वाहून जाणारे पाणी सोलापूर व मराठवाड्याला देण्याचे आश्‍वासन दिले. हिच कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना असून यासाठी विजयसिंह मोहिते पाटील व रणजितसिंह मोहिते पाटील हे प्रयत्न करत आहेत. जागतिक बँकेच्या मदतीने ही योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न मागील तीन वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना करण्यात आला होता. या योजनेमुळे कोल्हापूर व सांगली भागातील पुराचे संकट ही कमी करता येवू शकते व सोलापूरसह मराठवाड्याला पाणी मिळू शकते. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर तातडीने त्यांनी या योजनेचा आढावा घेतला होता. आमदार मोहिते पाटील यांनी ही त्यांना निवेदन दिले होते.


दरम्यान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे आमदार मोहिते पाटील यांचे मित्र आहेत. आषाढीला पंढरपूरला आले असता सहकुुटुंब अकलूजला मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी गेले होते. अकलूज नगरपरिषद व नातेपुते नगरपंचायत व्हावी यासाठी मोहिते पाटील समर्थकांनी जो लढा दिला होता तेंव्हा महाविकास आघाडी सरकार असताना ही नगरविकास मंत्री असणार्‍या एकनाथ शिंदे यांनी यास मंजुरी देवून आंदोलन थांबविले होते. त्यावेळी स्वतः विजयसिंह मोहिते पाटील हे शिंदे यांच्या भेटीसाठी गेले होते.


दरम्यान राज्यात सत्ताबदल होत असताना सर्वांना देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार असे वाटत होते. यामुळे भाजपाचे पदाधिकारी फडणवीस हेच आता महापूजेला येणार असे सांगत होते. मात्र फडणवीस यांनी शिंदे यांचे नाव सूचविले होते.  फडणवीस हे पंढरपूरला आले की ते नेहमी प्रशांत परिचारक यांचे बंधू उमेश परिचारक यांच्या पंतनगर येथे जात. यंदा मुख्यमंत्री म्हणून आलेल्या एकनाथ शिंदे यांनीही परंपरा जपत वेळात वेळ काढून पंतनगरच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यामुळे परिचारक समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. येथे त्यांनी पंढरपूरच्या विकासाबाबत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले.

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close