माळशिरस नगरपंचायतीवर भाजपाचा झेंडा , विजयी उमेदवार यादी
विजयी उमेदवार ः प्रभाग 1 – कैलास वामन 249 (म.वि.आ), प्र. 2- ताई वावरे बिनविरोध (अपक्ष, प्र.3 – पूनम वळकुंदे 407 (अपक्ष, प्र. 4 – विजय देशमुख 464 (भाजपा), प्र. 5 – शोभा धाईंज 302 (भाजपा), प्र. 6- आबा धाईंज 360 (भाजपा), प्रभाग 7- आप्पासाहेब देशमुख 307(भाजपा), प्र.8- कोमल जानकर 309 (भाजपा) प्रियंका टेळे, प्र. 9- राणी शिंदे 347(भाजपा), प्र.10 -अर्चना देशमुख 594 (भाजपा), प्र. 11- रेश्मा टेळे 335 (म.वि आ.) प्र. 12 -प्राजक्त ओहोळ 324 (भाजपा), प्र.13-शिवाजी देशमुख 553 (राष्ट्रवादी), प्र. 14- मंगल गेजगे 451(अपक्ष), प्र. 15- मंगल केमकर 508 (भाजपा), प्र.16 – पुष्पावती कोळेकर 461(भाजपा), प्र. 17 – रघुनाथ चव्हाण 396 (राष्ट्रवादी).
माळशिरस – माळशिरस नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सतरापैकी दहा जागा जिंकून आपली सत्ता कायम राखली आहे. राष्ट्रवादी व महाराष्ट्र विकास आघाडीचे प्रत्येकी दोन व अपक्ष तीन उमेदवार विजयी झाले आहेत.
या निवडणुकीत भाजपकडून आप्पासाहेब देशमुख, संजीवनी पाटील व मिलिंद कुलकर्णी यांच्या गटाच्या दहा जागा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तुकाराम देशमुख गटाच्या दोन जागा यासह महाराष्ट्र विकास आघाडी माणिकराव वाघमोडे गटाच्या दोन जागा व अपक्ष तीन जागा निवडून आल्या आहेत. तर येथे काँग्रेसला आपले खातेही उघडता आले नाही. या रणधुमाळीत राष्ट्रवादीचे पॅनलप्रमुख तुकाराम देशमुख व महाराष्ट्र विकास आघाडीचे माणिकराव वाघमोडे यांच्यासह भाजपच्या माजी नगराध्यक्षा लक्ष्मी सावंत यांचे चिरंजीव आकाश सावंत , माजी नगराध्यक्ष लतादेवी सीद यांचे दीर रामचंद्र सीद, विद्यमान सदस्य नूतन वाघमोडे व तसेच नगरसेवक नवनाथ वाघमोडे यांच्या पत्नी सुरेखा वाघमोडे यांना पराभव पत्करावा लागला आहे.
माजी नगराध्यक्ष द्रुपदी देशमुख यांचे चिरंजीव विजय देशमुख ,माजी उपनगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख व त्यांच्या सुविद्य पत्नी अर्चना देशमुख व भाजपकडून आबा धाईंजे व त्यांच्या सुविद्य पत्नी शोभा धाईंजे तसेच रेश्मा टेेळे हे विजयी झाले आहेत. तसेच संतोष वाघमोडे यांनी मंगल गेजगे यांना निवडून आणून आपला गड राखला आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंगळवेढा प्रांताधिकारी बाबासाहेब समिंदर तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जगदीश निंबाळकर यांनी काम पाहिले. पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी चोख बंदोबस्त राखला होता. निकालानंतर विजयी उमेदवारांनी माळशिरस शहरात गुलाल खेळत व फटाक्यांची आतषबाजी केली.