महाळुंग श्रीपूरमध्ये स्थानिक आघाड्यांचा बोलबाला ;
मोहिते पाटील समर्थक आघाड्या एकत्र येण्याची शक्यता
श्रीपूर – महाळुंग-श्रीपूर नगरपंचायत निवडणुकीत स्थानिक आघाड्यांचा बोलबाला पाहावयास मिळाला असून मुंडफणे व रेडे पाटील या मोहिते पाटील समर्थक दोन आघाड्यांनी मिळून नऊ जागा जिंकल्या आहेत. तर राष्ट्रवादीने सहा जागांवर विजय मिळविला.
बुधवारी सकाळी मतमोजणी झाली. यात राष्ट्रवादी काँग्रेसला सहा, भाजप एक, काँग्रेस एक,
भीमराव रेडे प्रणित पॅनलला पाच तर नानासाहेब मुंडफणे यांच्या आघाडीला चार जागा मिळाल्या आहेत. प्रभाग 16 मधून नाजिया पठाण या महिला ओबीसी प्रवर्गातील असून त्या खुल्या जागेवरून निवडून आल्या आहेत. तर सर्वाधिक मताधिक्य तानाजी भगत यांनी 408 चे मिळविले आहे.
विजयी उमेदवार पुढील प्रमाणे- प्रभाग 1 – कल्पना विक्रांत काटे (काँग्रेस )223 मतं, प्र.2- राहुल कुंडलिक रेडे पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)236, प्र. 3 – सविता शिवाजी रेडे (रा.काँ) 311, प्र.4 – उज्वला जालिंदर लोखंडे (स्थानिक आघाडी
भीमराव रेडे पाटील पॅनल) 310, प्र. 5- लक्ष्मी अशोक चव्हाण (भीमराव रेडे पाटील पॅनल) 316, प्र. क्र. 6 – जोत्स्ना रावसाहेब सावंत पाटील (रा.काँ.)389 , प्रभाग 7- तानाजी नवनाथ भगत (नानासाहेब मुंडफणे पॅनल) 408, प्र.8- सोमनाथ रघुनाथ मुंडफणे (नानासाहेब मुंडफणे पॅनल) 261, प्र. क्र. 9 नानासाहेब सुदाम मुंडफणे (स्थानिक
आघाडी प्रमुख) 370, प्र. 10 – स्वाती संजय लाटे (भीमराव रेडे पाटील पॅनल) 232 , प्र. क्र.11 – प्रकाश वामन नवगिरे (भाजप) 169 मते विजयी, प्र.12- टे तेजश्री विक्रमसिंह लाटे (रा.काँ.)126 , प्र.क्र.13
भीमराव रेडे पाटील 220, प्र.क्र. 14- शारदा नामदेव पाटील (रा.काँ.) 147 मते विजयी, प्र.क्र. 15 निनाद प्रभाकर पटवर्धन (रेडे पाटील पॅनल) 184, प्र.क्र.16- नाजिया मोहसिन पठाण (मुंडफणे पॅनल )129 , प्र.क्र. 17 नामदेव हरिबा इंगळे (राष्ट्रवादी काँग्रेस) 111 मतं. 17 प्रभागांमध्ये नोटाला 93 मतदारांनी पसंती दिली आहे.
या नगरपंचायतीमध्ये कोणालाही स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. परंतु स्थानिक मोहिते-पाटील गटांच्या दोन आघाड्यांचे 5 आणि 4 असे एकूण 9 उमेदवार एकत्रित येवून सत्ता स्थापन करू शकतात.