राज्य
मनसे युवा नेते अमित ठाकरे सोलापूरसह सहा दिवस पश्चिम महाराष्ट्र दौरा करणार
पंढरपूर – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते व राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे ७ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत पश्चिम महाराष्ट्र दौरा करत असून ते सांगली, सातारा, सोलापूर व पुणे भागात गाठीभेटी, मंदिरात देवदर्शन तसेच पक्षाच्यावतीने आयोजित बैठकांना हजेरी लावणार आहेत. अमित ठाकरे यांनी दिवाळीपूर्वीच मराठवाडा दौरा केला होता. यास चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यानंतर आता ते पश्चिम महाराष्ट्र दौरा करणार आहेत. याची सुरुवात सांगली भागातून ७ नोव्हेंबर रोजी होणार आहे. ते यानंतर सातारा, सोलापूर, पुणे जिल्ह्यात जाणार आहेत. मनसे कार्यकर्त्यांमध्ये यामुळे उत्साहाचे वातावरण आहे. त्यांचा सविस्तर दौरा खालीलप्रमाणे असणार आहे.