विशेष

पंढरपुरात “साहेब करंडक 2021” या भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन


पंढरपूर – राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस व सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य महिला व पुरूष खुला गट कबड्डी निवड चाचणी स्पर्धेचे दि.15 ते 17 डिसेंबर 2021 दरम्यान पंढरपूर शहरातील टिळक स्मारक मैदान, स्टेशन रोड येथे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांनी दिली.


कबड्डी व कुस्तीचे माहेरघर म्हणून पंढरपूरची ओळख होती. पंढरपूरमध्ये अनेक राष्ट्रीय खेळाडू होवून गेलेले आहेत. त्यामध्ये कै.अनंतराव पटवर्धन, प्रा.देवधर सर, संजय अभ्यंकर, दादा कांबळे, चंदुलाल शहा, दत्तोपंत मुळे, कै.जालिंदर वाडेगावकर यांच्यासह अनेकांचा यात समावेश आहे. त्याच धर्तीवर सध्या काळात ग्रामीण व शहरी भागातील खेळाडूंनी प्रोत्साहन मिळावे, या हेतूने राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

स्पर्धेचे सामने भारतीय हौसि कबड्डी महासंघ यांच्या नियमानुसार साखळी व बाद पध्दतीने खेळविण्यात येणार आहेत. सदरची स्पर्धा अत्याधुनिक पध्दतीने मॅटवर होणार आहे.
या स्पर्धेत 250 पुरूष खेळाडू व 100 महिला खेळाडू सहभागी होणार आहेत. यातून महाराष्ट्र कबड्डी स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार आहे. याचे उद्‌घाटन दि.15 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरूण लाड, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे यांच्याहस्ते तर साईनाथभाऊ अभंगराव, प्रणिताताई भालके, सहकार शिरोमणी कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, गटनेते सुधीर धोत्रे, राहुल साबळे, किरण घाडगे, अनिल अभंगराव, पश्चिम महाराष्ट्र नेते अरूण कोळी, धनंजय कोताळकर, महमद उस्ताद, संजयबाबा ननवरे, सुधीर भोसले, विजय देशमुख, संदिप मांडवे, नगरसेवक प्रशांत शिंदे, सतीश शिंदे, प्रशांत मलपे, महादेव भालेराव यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
तर बक्षीस वितरण समारंभ दि.17 डिसेंबर रोजी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार शहाजी पाटील, दीपकआबा साळुंखे, राष्ट्रवादी कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे, प्रणिताताई भालके, उद्योगपती अभिजीत पाटील, मनसेचे नेते दिलीप धोत्रे, युवराजदादा पाटील,निरीक्षक शरद लाड, प्रदेश सरचिटणीस प्रशांत बाबर, जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, राष्ट्रवादी महिला निरीक्षक दिपालीताई पांढरे, मंगळवेढा नगरसेवक अजित जगताप, संतोषभाऊ नेहतराव, लतिफ तांबोळी, मारूती जाधव, महिला जिल्हाध्यक्ष सुप्रियाताई गुंड, संजय बंदपट्टे, संतोष सुळे, जुबेर बागवान, शहराध्यक्ष स्वप्नील जगताप यांच्याहस्ते संध्याकाळी 8 वाजता होणार आहे. तरी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी दादा थिटे, संतोषआण्णा बंडगर, तानाजी मोरे, बालाजी कवडे, सुर्यकांत बागल, सूरज गंगेकर, सूरज ज कांबळे हे परिश्रम घेत आहेत.

Header

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close