राज्य

सांगोला कारखान्यामुळे चार तालुक्यातील शेतकर्‍यांचा फायदा


सांगोला – सांगोला कारखाना चालविण्यासाठी कोणी घेत नव्हते परंतु अभिजित पाटील यांनी तीन कारखाने यशस्वीपणे चालवल्याचा अनुभव सोबत घेऊन येथे येण्याचे धाडस दाखवले आहे. त्याची धडाडी आणि सहकार क्षेत्रातील असलेला दांडगा अनुभव असल्याने त्यांनी केवळ पंधरा ते वीस दिवसांत आपल्या संघटन कौशल्याच्या जोरावर हा कारखाना सुरू केला असून यामुळे सांगोला, माळशिरस, पंढरपूर, मंगळवेढा भागातील शेतकर्‍यांचा फायदा होणार असल्याचे प्रतिपादन सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
धाराशिव साखर कारखाना युनिट क्र.4 (सांगोला सह.साखर कारखाना) येथे गळीत हंगामाचा शुभारंभ  पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील, सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे पाटील, शेकाप नेते चंद्रकांत देशमुख, मनसे नेते दिलीप धोत्रे, अविनाश महागावकर उपस्थित होते.
पाटील म्हणाले, अभिजित पाटील यांनी  तीन कारखाने ज्या चांगल्या पद्धतीने चालवले तसेच हा कारखाना चालवतील व शेतकर्‍यांना योग्य मोबदला देतील अशी अपेक्षा आहे. गाळप हंगाम यशस्वी करण्यासाठी शेतकर्‍यांनी कारखाना व्यवस्थापनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. कारखान्याकडे नोंदलेल्या संपूर्ण उसाचे गाळप झाले पाहिजे त्या दृष्टीने नियोजन करावे.यंदा पाऊसकाळ चांगला झाला असून, शेतीला पाणी कमी पडणार नाही, तरीही शेतकर्‍यांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बोलताना अध्यक्ष अभिजित पाटील म्हणले, कारखान्याला ऊस देणार्‍या प्रत्येक शेतकर्‍यांना एफआरपी प्रमाणे दर दिला जाईल. तसेच सभासदांच्या व कामगारांच्या हितासाठी भविष्यात सहवीज निर्मिती व आसवनी प्रकल्प उभारला जाईल. कारखान्याचे यंदाच्या वर्षी 5 लाख मे.टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे.

Header

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा IT Act 2000 नुसार गुन्हा आहे.
Close
Close