राज्य

अकलूज, माळेवाडी नगरपरिषद व नातेपुते नगरपंचायतीला राज्य सरकारचा हिरवा कंदील, नागरिकांच्या 43 दिवसाच्या आंदोलनाला यश

त्याअर्थी आता , उक्त अधिनियमाचे कलम ३४१ क चे पोट – कलम ( १ ) , ( १ ख ) आणि ( २ ) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करुन व त्याबाबतीत समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करुन , महाराष्ट्र शासन , याद्वारे उक्त स्थानिक क्षेत्र हे , संक्रमणात्मक क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट करीत असून , त्यासाठी उक्त अधिनियमाच्या कलम ३४१ क चे पोट – कलम ( २ ) मध्ये तरतूद केल्याप्रमाणे , “ नातेपुते नगरपंचायत ” या नावाने एक नगरपंचायत घटीत करण्यात येत आहे . उक्त संक्रमणात्मक क्षेत्राच्या हद्दी यासोबत जोडलेल्या अनुसूची ” ब ” मध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे असतील . अनुसूची ” अ ” संक्रमणात्मक क्षेत्राच्या अधिक तपशिलवारपणे वर्णन केलेले स्थानिक क्षेत्र नातेपुते या गावचे गावठाण व गट नं . १ ते ८११ मध्ये असलेले संपूर्ण महसूली क्षेत्र .
[03/08, 8:00 pm] ओंकार आडत: क्रमांक एमयुएन -२०१ ९ / प्र.क्र .२१५ / नवि -१८ : ज्याअर्थी , शासनाने महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ ( १ ९ ६५ चा महा .४० ) ( यात यापुढे ज्याचा उल्लेख “ उक्त अधिनियम ” असा करण्यात आला आहे ) याच्या कलम ३ चे पोट – कलम ( २ ) , ( २ क ) व ( ३ ) यांच्या तरतुदीनुसार , शासन उद्घोषणा , नगर विकास विभाग क्रमांक एमयुएन २०१ ९ / प्र.क्र .२१५ / नवि -१८ , दिनांक ११ सप्टेंबर , २०१ ९ याव्दारे महाराष्ट्र शासन राजपत्र उद्घोषणा प्रसिध्द केली असून महाराष्ट्र शासनाने सोलापूर जिल्हयातील अकलूज व माळेवाडी या दोन ग्रामपंचायतीचे एकत्रित स्थानिक क्षेत्र , ग्रामीण क्षेत्रातून लहान नागरी क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट करण्याच्या आणि उक्त स्थानिक क्षेत्रासाठी “ अकलूज नगरपरिषद ” या नावांने नगरपरिषद गठीत करण्याच्या दृष्टीने , उक्त अधिनियमाचे कलम ३ चे पोट – कलम ( २ ) , ( २ क ) व ( ३ ) या अन्वये अधिसूचना काढण्याच्या आपल्या प्रस्तावावर आक्षेप मागविले होते ; आणि ज्याअर्थी शासन उद्घोषणा नगर विकास विभाग क्र . एमयएन -२०१ ९ / प्र.क्र .२१५ / नवि -१८ , दि .११.० ९ .२०१ ९ स्थानिक वर्तमान पत्रामध्ये प्रसिध्द करण्यात आली होती . आणि ज्याअर्थी , उक्त उदघोषणेमध्ये नमूद कालावधीत जिल्हाधिकारी , सोलापूर यांच्याकडे प्राप्त झालेल्या आक्षेपांचा शासनाने विचार केला आहे ; आणि ज्याअर्थी , भारताचे संविधानाच्या अनुच्छेद २४३ – थ च्या खंड ( २ ) मध्ये नमूद केलेल्या बाबी विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाला , यासोबत जोडलेल्या अनुसूची ” अ ” मध्ये अधिक तपशीलवारपणे वर्णन केलेले उक्त स्थानिक क्षेत्र हे लहान नागरी क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट करणे इष्ट वाटते ;

त्याअर्थी , आता , उक्त अधिनियमाच्या कलम ३ चे पोट – कलम ( २ ) , ( २ क ) व ( ३ ) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करुन उक्त स्थानिक क्षेत्र हे लहान नागरी क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट करीत असून , त्याकरीता उक्त अधिनियमाचे कलम ३ चे पोट – कलम ( २ ) , ( २ क ) व ( ३ ) मध्ये तरतूद केल्याप्रमाणे “ अकलूज नगरपरिषद ” या नावाने एक नगरपरिषद गठीत करीत आहे . उक्त लहान नागरी क्षेत्राच्या हद्दी यासोबत जोडलेल्या अनुसूची “ ब ” मध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे असतील . अनुसूची ” अ ” अकलूज नगरपरिषदेच्या हद्दीमध्ये समाविष्ट करावयाच्या स्थानिक क्षेत्राचे वर्णन अकलूज गावचे गावठाण व सर्वे नं . १ ते १७० मध्ये असलेले संपुर्ण महसुली क्षेत्र माळेवाडी ( आ गावचे सर्वे नं .१ ते ८७ मध्ये असलेले संपुर्ण महसुली क्षेत्र

Header

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close