अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 160 जणांचे रक्तदान, विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
पंढरपूर – श्री विठ्ठल साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांचे 39 व्या वाढदिवसानिमित्त स्वेरी कॉलेजचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे यांच्या हस्ते त्यांचा मानचिन्ह, विजयी रथ देऊन व केक कापून सत्कार करण्यात आला. दरम्यान यावेळी कारखाना कार्यस्थळावर आयोयित रक्तदान शिबिरात 160 जणांनी सहभाग नोंदविला.
अक्षय ब्लड बँक सोलापूर, पंढरपूर ब्लड बँक व विठ्ठल कारखाना यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केलें होते. याचे उद्घाटन डॉ.बी.पी.रोंगे व कारखान्याच्या सर्व संचालकांच्या हस्ते करण्यात आले. तसेच श्री विठ्ठल प्रशाला, वेणूनगर येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, गणवेश व खाऊ वाटप करण्यात आले. कारखाना परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. तसेच नागनाथ मूकबधिर विद्यालय, बाभुळगांव येथे प्रीतीभोजन देण्यात आले.
यावेळी रोंगे यांनी, रक्तदानाचे महत्व सांगत सर्वांनी रक्तदान करुन गरजू लोकांना जीवनदान द्यावे, असे आवाहन केले. यावेळी पाटील यांच्या कामाचा गौरव करताना रोंगे म्हणाले, अभिजीत पाटील यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते हे सत्कारासाठी सतत येत असल्यामुळे त्यांचा मान राखण्यासाठी अभिजीत पाटील ते सत्कार स्वीकारत आहे. यासाठी दिवसातील बराच वेळ जातो. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत ते कारखान्यातील कामाचे नियोजन करण्यासाठी येथे थांबून काम करत आहेत. परंतु याचे कौतुक करण्याऐवजी विरोधक अपप्रचार करत आहेत.
याप्रसंगी कार्यकारी संचालक डी.आर.गायकवाड यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी कारखान्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी, श्री विठ्ठल क्रेडिट पत्तसंस्था, श्री विठ्ठल कामगार पतसंस्था, श्री विठ्ठल प्रशालेतील कर्मचारी यांच्यावतीने अभिजीत पाटील यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास संचालचक दिनकर चव्हाण, जनक भोसले, प्रवीण कोळेकर, अशोक जाधव, साहेबराव नागणे, कालिदास पाटील, कालिदास साळुंखे, सचिन वाघाटे, सुरेश भुसे, बाळासाहेब हाके, सिताराम गवळी, सिध्देश्वर बंडगर, दशरथ जाधव, अशोक तोंडले, तुकाराम मस्के उपस्थित होते. सूत्रसंचालन बी.एल.रोडगे व प्राचार्य नागटिळक यांनी केले.