Uncategorized

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण योजनेचा पंढरपूरमध्ये संत मुक्ताबाई मठातून शुभारंभ

पंढरपूर,- मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ संत मुक्ताबाई मठ येथे विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याहस्ते करण्यात आला. राज्यातील महिलांनी याचा लाभ घ्यावा यासाठी रविवार दिनांक 21 जुलै रोजी गुरुपौर्णिमेपासून याचे राज्यभरात अभियान राबविले जाणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

या कार्यक्रमास अक्षय महाराज भोसले, स्वामी महामंडलेश्वर जनार्दन हरि महाराज, मुक्ताई पालखी सोहळयाचे अध्यक्ष रविंद्र भैय्यासाहेब पाटील, पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. रविंद्र महाराज हरणे, विश्वस्त पंजाब दादा पाटील,सम्राट पाटील, ज्योती वाघमारे यांच्यसह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे राज्य शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेचा लाभ 21 ते 65 वयोगटातील प्रत्येक महिलेला मिळाला पाहिजे यासाठी सर्व शासकीय यंत्रणेने प्रयत्न करावेत. शासन ही या योजनेची मोठ्या प्रमाणावर प्रचार प्रसिद्धी करत असून ग्राम स्तरावरील प्रत्येक पात्र महिलेपर्यंत ही योजना पोहोचावी, असे डॉक्टर गोऱ्हे यांनी सांगितले.
यावेळी एसटीच्या जादा गाड्या, वारकऱ्यांच्या वाहनांसाठी पथकर माफी तसेच महिलांना 50 टक्के व 75 टक्के वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवास एस.टी अशा सुविधा उपलब्ध असून, या सुविधांसह वारकऱ्यांचा विमा देखील काढला असल्याचे डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.

Header
Tags

Related Articles

Check Also
Close
Back to top button
Close
Close