विशेष

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघासाठी
ग्रामसडक योजनेतून 34 कोटी 31 लाख रू. निधी मंजूर


पंढरपूर – पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील रस्त्यांसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा – 2 अंतर्गत मतदारसंघातील रस्त्यांच्या दर्जा उन्नतीसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांच्या माध्यमातून 34 कोटी 31 लाख रुपये मंजूर झाले आहेत, अशी माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे.
पंढरपूर तालुक्यातील कासेगाव ते घायाळ वस्ती या मार्गावरील रस्त्याच्या रुंदीकरण व दर्जा सुधारणा करण्यासाठी 3 कोटी कोटी 52 लाख रुपये, तसेच राज्य मार्ग 143(फूट रस्ता) ते गादेगाव रस्त्याच्या सुधारणेसाठी 4 कोटी 65 लाख इतका निधी मंजूर झाला आहे. त्याचबरोबर मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव शेलेवाडी, आसबेवाडी ते मारापूर या रस्त्यासाठी 9 कोटी 44 लाख, दामाजी कारखाना चौक ते ब्रह्मपुरी 8 कोटी 3 लाख, मंगळवेढा ते मुंढेवाडी व ते तामदर्डी तांडोर 8 कोटी 4 लाख रुपये असा निधी मंजूर झाला आहे.
आ. आवताडे यांच्या प्रयत्नांतून यापूर्वीही राज्य शासनाच्या विविध विकासाभिमुख योजनांमधून पंढरपूर – मंगळवेढा तालुक्यातील विविध रस्ते सुधारणा आणि बांधणीसाठी मोठा निधी प्राप्त झाला आहे. विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावाचा समतोल विकास व्हावा यासाठी आवताडे यांनी राज्य शासनाकडे यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्यांच्या मागणीवरून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सदर निधी मंजूर झाला आहे.
मतदारसंघातील नागरिकांनी माझ्यावर जो विश्‍वास ठेवला तो मी कामातून सार्थ ठरविणार आहे. येत्या काळात केंद्र व राज्य शासनामार्फत उर्वरित रस्ते कामांसाठी लागणार्‍या निधीसाठी पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचे आ. आवताडे यांनी सांगितले.

मंगळवेढा तालुका ः विविध गावांत 65 लाखांची कामे होणार
पंढरपूर –  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या पायाभूत व मुलभूत सोयी-सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी 65 लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे.
सदर योजनेमध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या विकासासाठी कार्य करणार्‍या व्यक्तींची स्थळे तसेच सांस्कृतिक व ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या असणार्‍या स्थळांचा विकास व त्यांची स्मारके उभा करणे याकामांचा समावेश असल्याची माहिती आवताडे यांनी दिली आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या शिक्षण, आरोग्य, रस्ते पाणी या सुविधा समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी या महत्त्वकांक्षी योजनेमार्फत हा भरीव निधी मंजूर झाला आहे.
सदर योजनेअंतर्गत निधी मंजूर झालेली गावे व कामे – सोड्डी येथील बिरुनगी – ऐवळे वस्ती पेव्हर ब्लॉक बसवणे 10लाख रुपये, भोरकडे -कांबळे वस्ती रस्ता काँक्रिटीकरण करणे 10 लाख, येळगी येथील भोरकडे – शिंदे वस्तीकडे जाणारा रस्ता काँक्रिटीकरण  10 लाख , मानेवाडी येथील दलित वस्तीमध्ये पेव्हर ब्लॉक बसवणे व रस्ता काँक्रिटीकरण करणे प्रत्येकी 5 लाख , हिवरगाव येथील दलित वस्तीमध्ये रस्ता काँक्रिटीकरण करणे 10 लाख व व स्मशानभूमी सुशोभिकरण करणे 5 लाख , येड्राव येथील दलित वस्तीमध्ये पेव्हर ब्लॉक बसविणे 10 लाख रुपये.

Header
Tags

Related Articles

Back to top button
Close
Close