विशेष

उजनी उपयुक्त पातळीत @ 35.27%


पंढरपूर – भीमा नीरा खोर्‍यातील पाऊस पूर्णतः थांबला नसून तो मध्यम स्वरूपात अनेक प्रकल्पांवर कोसळत आहे. यामुळे धरणं समाधानकारक पाणी पातळीत भरत आहेत. दौंडची आवक मंदावल्याने उजनीचा टक्केवारीच्या पन्नाशीकडील प्रवास हळूहळू सुरू आहे. धरण सोमवारी सायंकाळी सहा वाजता उपयुक्त पातळीत 35.27 टक्के भरले होते.
उजनीत दौंडजवळून येणारी आवक ही कमी होवून आता 16 हजार 867 क्युसेक इतकी झाली आहे. याचे कारण म्हणजे भीमा खोर्‍यात कमी झालेले पावसाचे प्रमाण व वरील धरणांमधून सोडण्यात येणार्‍या पाण्याचे कमी केलेेले प्रमाण आहे. खडकवासला प्रकल्पाचे दरवाजे आता बंद करण्यात आले आहेत. कलमोडीमधून 1270 क्युसेक तर वडीवळे 587, आंध्रा 1462 तर कासारसाईमधून 250 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. खडकवासलामधून पाणी सोडणे बंद झाल्याने पुणे बंडगार्डनचा विसर्ग 13 हजार 830 क्युसेक इतका  कमी झाला आहे.
नीरा खोर्‍यात झालेल्या मुसधार पावसाने गुंजवणी 86.66 तर देवघर 88 तर भाटघर 61.31 आणि वीर 97.18 टक्के भरले आहे.

Header

Related Articles

Back to top button
Close
Close