विशेष
-
कासेगाव व पंढरपूर मंडलात सर्वाधिक मान्सूनपूर्व पावसाची नोंद
पंढरपूर – रविवार 26 मे रोजी सायंकाळी पंढरपूर शहर व तालुक्यामध्ये सरासरी 18.77 मिलिमीटर इतके मान्सूनपूर्व पावसाची नोंद झाली आहे.…
Read More » -
मोलमजुरी करणाऱ्या महिलेकडून श्री विठ्ठल चरणी २० ग्रॅम सोनं अर्पण
पंढरपूर – उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करणाऱ्या शकुंतला एकनाथ वाघ (रा. मजरे ता. चाळीसगाव जि. जळगाव) यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीस…
Read More » -
राज्यातील पाणी प्रकल्पांची स्थिती बिकट, भीमा निरा खोऱ्यातील धरण ही तळ गाठू लागली
पंढरपूर – 2023 मध्ये झालेल्या कमी पावसामुळे राज्यातील सर्व मोठ्या प्रकल्पांमधील पाणीसाठे यंदा मे महिन्याच्या मध्यालाच खालावले असून 138 धरणांमध्ये…
Read More » -
कॅरिडॉरप्रश्नी आम्ही पंढरपूरच्या नागरिकांसमवेत आहोत, प्रशांत परिचारक यांची ग्वाही
पंढरपूर – कॅरिडॉर प्रकरणी पंढरपूरमध्ये विशेषतः मंदिर परिसरातील नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असताना माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी, येथील व्यापारी व…
Read More » -
पंढरपूरची विकासकामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना,अंतिम सुधारित आराखड्यात 413 कोटी रू. तरतूद
पंढरपूर – . सुधारित आराखड्यामध्ये श्री क्षेत्र देहू , आळंदी, भंडारा डोंगर, नेवासा , पंढरपूर तसेच पालखी मार्ग व पालखी तळांवर मुलभूत सुविधा देण्यासाठीच्या कामांचा समावेश केला आहे. अंतिम सुधारित आराखड्यामध्ये पंढरपूर विकास आराखड्यासाठी 413 कोटी 13 लाखांची तरतूद केली होती. या अंतर्गत पूर्ण झालेली कामे वगळता अन्य प्रस्तावित कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले.पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्या अंतर्गत प्रगतिपथावर असलेल्या कामांचा आढावा शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे चव्हाण यांनी घेतला. यावेळी आमदार समाधान आवतडे,आमदार सुभाष देशमुख, माजी आमदार प्रशांत परिचारक, उत्तम जानकर,अधिक्षक अभियंता संजय माळी, कार्यकारी अभियंता अमित निमकर तसेच पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, पंढरपूर येथे आषाढी, कार्तिकी, चैत्री, माघी या यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखोच्या संख्येने भाविक येतात. येणार्या भाविकांना तसेच स्थानिक नागरिकांना चांगल्या सुविधा कशा पद्धतीने मिळतील यासाठी उर्वरित कामे दर्जेदार होण्यासाठी अधिकार्यांनी कालबद्ध नियोजन करावे. सुरू असलेली कामे मागे पडणार नाहीत याची काटेकोरपणे दक्षता घ्यावी. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून गतिमान पद्धतीने कामे करण्यात येत असून,जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून दीड वर्षात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत. विकासकामांना निधीची कमतरता भासणार नाही. नागरिकांच्या सोयी सुविधेसाठी तसेच प्रशासकीय कामात गतिमानता येण्यासाठी प्रत्येक तालुक्यात अत्याधुनिक व सुसज्ज अशी प्रशासकीय इमारती बांधण्यात येणार आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.गेल्या दोन वर्षात सोलापूर जिल्ह्यात रस्ता सुधारणा करणे, नवीन रस्ता करणे रस्ता करणे अशा 820 कामांना 1 हजार 834 कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत. सुधारित आराखड्यानुसार सद्यस्थितीत पंढरपूर शहरातील विकास कामांमध्ये पंढरपूरकडे येणारे रस्ते व पालखी मार्ग, पालखी तळ विकास, पालखीतळ भूसंपादन, नामदेव स्मारक अशी 108 कामे मंजूर असून, त्यापैकी 66 कामे पूर्ण झाली तर 16 कामे प्रगतिपथावर आहेत. यामधून 16 कामे शासनाने वगळली आहेत तर 9 कामे सुरू करावयाचे आहेत.वारी व इतर कालावधीत वाहन पार्किंगसाठी यमाई तलावाजवळील वाहनतळ विकसित करण्यात येत असून ते काम प्रगतिपथावर आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून शौचालयाची कामे सुलभ इंटरनॅशनल यांच्यामार्फत करण्यात येत आहेत. पंढरपूर शहरात एकूण 18 ठिकाणी सुलभ शौचालय बांधण्यात आली आहेत. तर पाच ठिकाणी सुलभ शौचालय बांधण्याचे काम सुरू आहे. तसेच वारी कालावधीत वारकरी भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिर व वाळवंट परिसरात तीन पोलीस चौकी व तीन वॉच टॉवर पोलीस विभागाच्या मागणीनुसार मंजूर करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील पालखी तळ व रिंगण विकासाची 21 कामे पूर्ण झाली असल्याची माहिती अधीक्षक अभियंता संजय माळी यांनी दिली.
Read More » -
एसटी चालक आणि वाहकाचा प्रामाणिकपणा ; पाच लाखाचा ऐवज प्रवाशाला सुपूर्द
सोलापूर – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाची बॅग गाडीतच विसरली. त्यानंतर एसटीचे चालक आणि वाहक या दोघांच्याही…
Read More » -
गाळपात “विठ्ठल” तर साखर उताऱ्यात “पांडुरंग” साखर कारखाना आघाडीवर
पंढरपूर – यंदाच्या 2023-24 च्या गळीत हंगामात गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा चांगले गाळप करत असून दररोज…
Read More » -
उजनी व नीरा खोर्यातील धरणात गतवर्षीपेक्षा किती कमी पाणीसाठा?
https://youtu.be/nczmQdoRXLQ?si=oXaAjLL634aEqyFK उजनी ,नीरा खोरे VDO news 👆 पंढरपूर- यंदा कमी पाऊस झाल्याने राज्यातील धरणांमध्ये कमी जलसाठा होवू शकला आहे. सर्वात…
Read More » -
मोहोळ – आळंदी पालखी मार्गावरील दिवे घाट होणार चौपदरी, 792 कोटी रूपयांची तरतूद
पंढरपूर – महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग 965 या मोहोळ-आळंदी पालखी महामार्गावरील दिवे घाट ते हडपसर (पॅकेज-6) या 13.25 किलोमीटर लांबीच्या विद्यमान…
Read More » -
उजनी जलाशयात तब्बल २८ वर्षांनी १ कोटी मत्स्यबीज सोडली जातायेत
वालचंदनगर- उजनीतील माशांच्या चवीची सर्व महाराष्ट्राला ओळख आहे. त्यामुळे येथे विविध प्रजातींच्या माशांचे संगोपन होणे गरजेचे आहे,हे पाहता शासनाच्यावतीने दरवर्षी…
Read More »